AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs IND : मोहम्मद शमीचा ‘पंजा’, तॉहिदची शतकी खेळी, भारतासमोर 229 धावांच आव्हान, कोण जिंकणार?

CT 2025 India vs Bangladesh 1st Innings Highlights : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत बांगलादेसला 228 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियासाठी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

BAN vs IND : मोहम्मद शमीचा 'पंजा', तॉहिदची शतकी खेळी, भारतासमोर 229 धावांच आव्हान, कोण जिंकणार?
mohammed shami ban vs ind ct 2025Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Feb 20, 2025 | 7:02 PM
Share

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला स्वसतात गुंडाळलं आहे. बांगलादेशला भारतीय गोलंदाजांसमोर पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने बांगलादेशला 49.4 ओव्हरमध्ये 228 धावांवर गुंडाळलं. तॉहिद हृदॉय याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात 220 पार पोहचता आलं.  त्यामुळे भारताला विजयासाठी 229 धावांचं आव्हान मिळालं आहे. बांगलादेशला 230 धावांच्या आत रोखण्यात मोहम्मद शमीने निर्णायक भूमिका बजावली. शमीने टीम इंडियासाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली. आता गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडल्यानंतर भारतीय फलंदाजांवर जबाबदारी असणार आहे.

बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला झटपट 5 धक्के देत फलंदाजांची हवा टाईट केली. सौम्य सरकार, कॅप्टन नजमूल हुसैन शांतो आणि मुशफिकर रहीम या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर मेहदी हसन मिराजने 5 आणि तांझिद हसन याने 25 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे बांगलादेशची 5 बाद 35 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर तॉहिद हृदाय आणि जाकेर अली या दोघांनी सहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली आणि बांगलादेशची लाज राखली.

तॉहिद आणि जाकेर या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने ही जोडी फोडली. शमीने जाकेरला विराट कोहलीच्या हाती कॅच आऊट केलं. जाकेरने 114 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. त्यानंतर टीम इंडियाने झटपट धक्के देत बांगलादेशला ऑलआऊट केलं.

बांगलादेशसाठी तॉहिदने सर्वाधिक धावा केल्या. तॉहिदने 118 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 100 धावा केल्या. तॉहिदचं हे त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठरलं. तर रिशाद हौसेन याने 18 धावांचं योगदान दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने 53 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. हर्षित राणा याने तिघांना आऊट केलं. तर अक्षर पटेल याने दोघांना बाद केलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.

शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.