AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टी 20i मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, या खेळाडूकडे नेतृत्व, पहिला सामना कधी?

T20i Cricket : न्यूझीलंड टीम बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश-न्यूझीलंड यांच्यात टी 20i मालिकेतील पहिले 2 सामने हे एकाच ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. बांगलादेशने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी टीमची घोषणा केली आहे.

Cricket : टी 20i मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी टीम जाहीर, या खेळाडूकडे नेतृत्व, पहिला सामना कधी?
Litton Das Bangladesh CricketImage Credit source: AFP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 22, 2026 | 6:36 PM
Share

न्यूझीलंड क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. न्यूझीलंडने 26 धावांनी सामना जिंकत मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर बांगलादेशने दुसऱ्या सामन्यात आणि करो या मरो अशा स्थितीत न्यूझीलंडचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यामुळे आता 23 एप्रिलला होणारा तिसरा आणि अंतिम सामना निर्णायक होणार आहे. यजमान बांगलादेशसमोर मालिका जिंकण्याचं आव्हान असणार आहे. मात्र बांगलादेशसमोर न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे.

एकदिवसीय मालिकेनंतर उभयसंघात 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतही वनडे प्रमाणे एकूण 3 सामने होणार आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. लिटन दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीने एक्सद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

कुणाला विश्रांती आणि कुणाचं कमबॅक?

बांगलादेशने या टी 20I मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांतून नाहिद राणा, तस्कीन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान या तिघांना विश्रांती दिलीय. या तिघांना तिसऱ्या अर्थात शेवटच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून या तिघांना संधी न देण्यामागील कारणही सांगितलं आहे. युवा खेळाडूंना अधिकाअधिक संधी देता यावी यासाठी अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही.

बांगलादेशचा पहिल्या 2 सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ

बीसीबीकडून वेगवान गोलंदाज अब्दुल गफ्फार सकलैन याला संधी देण्यात आली आहे. अब्दुल अखेरच्या क्षणी बॅटिंग करण्यात माहिर आहे. तसेच वेगवान गोलंदाज रिपॉन मोंडल यालाही संधी देण्यात आलीय.

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 27 एप्रिल, चटगाव

दुसरा सामना, 29 एप्रिल, चटगाव

तिसरा सामना, 2 मे, ढाका

न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी बांगलादेश टीम : लिटन दास (कॅप्टन), परवेझ हुसैन इमोन, तांझीद हसन, मोहम्मद सैफ हसन, शमीम हुसैन,तॉहीद हृदॉय, नूरुल हसन, शाक महेदी हसन, नसुम अहमद, रिशाद हुसैन, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रिपन मोंडोल, शैफ उद्दीन आणि अब्दुल गफ्फार सकलैन.

Follow Us
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी