Odi Cricket : आशिया कपनंतर वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, टी 20i कॅप्टन दुखापतीमुळे आऊट, कुणाला संधी?
आशिया कप 2025 स्पर्धेनंतर निवड समितीकडून आगामी 3 सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतून टी 20i कॅप्टनला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेनंतर अनेक संघ द्विपक्षीय मालिका खेळत आहे. टीम इंडिया नवव्यांदा आशिया कप जिंकल्यानंतर मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळतेय. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात यूएईमध्ये 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने शुक्रवारी 3 ऑक्टोबरला अफगाणिस्तानवर मात करत मालिका जिंकली. बांगलादेश या मालिकेत 3-0 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा रविवारी 5 ऑक्टोबरला होणार आहे.
त्यानंतर 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून या मालिकेसाठी शनिवारी 4 ऑक्टोबरला संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीने मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला. मेहदी हसन मिराज बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. निवड समितीने आशिया कप स्पर्धेतील 11 खेळाडूंना एकदिवसीय मालिकेसाठी संधी दिली आहे. चौघांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर टी 20i कर्णधाराला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेलाही मुकावं लागलं आहे.
चौघांना डच्चू
निवड समितीन परवेझ हुसैन इमॉन, नसुम अहमद, मोहम्मद सैफुद्दीन आणि शोरीफूल इस्लाम या चौघांना डच्चू दिला आहे. तर टी 20i कॅप्टन लिटन दास याला दुखापतीमुळे वनडे सीरिजलाही मुकावं लागलं आहे. लिटनला आशिया कप स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून लिटन टीममधून बाहेर आहे.
सैफ हसन याला पहिल्यांदाच एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं आहे. सैफने नुकत्याच झालेल्या टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच नुरुल हसन याचं 2 वर्षांनंतर एकदिवसीय संघात पुनरागमन झालं आहे.
बांगलादेशचे 16 शिलेदार
Bangladesh ODI squad announced for the three-match series against Afghanistan in Abu Dhabi 🇧🇩🏏
Squad: Mehidy Hasan Miraz (C), Tanzid Hasan Tamim, Md Naim Sheikh, Mohammed Saif Hassan, Najmul Hossain Shanto, Tawhid Hridoy, Jaker Ali Anik, Shamim Hossain, Quazi Nurul Hasan… pic.twitter.com/0Umk5q1QE7
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 3, 2025
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 8 ऑक्टोबर, अबुधाबी
दुसरा सामना, 14 ऑक्टोबर, अबुधाबी
तिसरा सामना, 11 ऑक्टोबर, अबुधाबी
अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी बांगलादेश टीम : मेहदी हसन मिराज (कॅप्टन), तंझीद हसन, मोहम्मद नईम, सैफ हसन, नजमुल हुसेन शांतो, तॉहीद हृदोय, झाकेर अली, शमीम हुसैन, नुरुल हसन, रिशाद हुसैन, तनवीर इस्लाम, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन, हसन महमूद आणि नाहिद राणा.
