AFG vs BAN : पराभवासाठी बांग्लादेशच्या कॅप्टनने कोणाला धरलं जाबाबदार?

AFG vs BAN : अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर बांग्लादेशी कॅप्टन नजमुल हुसैन शांतोने प्रामाणिकपणे काही गोष्टी कबूल केल्या. काय चूका झाल्या? कुठे सुधारणा करण्याची आवश्यकता आहे? ते प्रामाणिकपणे मान्य केलं. पहिल्यांदाच अफगाणिस्तान टीमकडे कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे.

AFG vs BAN : पराभवासाठी बांग्लादेशच्या कॅप्टनने कोणाला धरलं जाबाबदार?
AFG vs BANImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 11:57 AM

T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बांग्लादेशच आव्हान संपुष्टात आलय. आजचा सामना बांग्लादेशच्या दृष्टीने तितका महत्त्वाचा नव्हता. कारण त्यांच्यासाठी विजयाच महत्त्व प्रतिष्ठाराखण्यापुरतं होतं. हा सामना अफगाणिस्तानसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण सेमीफायनलमधील त्यांचा प्रवेश जय-पराजयावर अवलंबून होता. महत्त्वाचा सामना असल्याने अफगाणिस्तानची टीम सुद्धा तशीच खेळली. त्यांनी रोमांचक सामन्यात बांग्लादेशला 8 धावांनी नमवून वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता सेमीफायनलमध्ये त्यांची गाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. मोक्याच्या क्षणी ढेपाळण्याचा दक्षिण आफ्रिकेचा इतिहास आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अफगाणिस्तान टीमकडे कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची चांगली संधी आहे. फायनलसाठी ते दावेदार सुद्धा आहेत, कारण संपूर्ण स्पर्धेत त्यांनी तसा खेळ सुद्धा दाखवलाय. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांना नमवलं.

दुसऱ्याबाजूला बांग्लादेश टीमची कामगिरी संपूर्ण स्पर्धेत तशी उठून दिसली नाही. अफगाणिस्तान आणि बांग्लादेश दोन्ही आशिया खंडातील टीम. बांग्लादेशच्या तुलनेत अफगाणिस्तानच संघ तसा नवखा. पण अफगाणिस्तान टीमने आज बांग्लादेशपेक्षा सरस खेळाच प्रदर्शन केलं. 115 इतक्या कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला. T20 क्रिकेटच्या दृष्टीने 115 ही तशी मोठी धावसंख्या नाहीय. पण अफगाणिस्तानच्या टीमने कमाल केली. त्यांनी बांग्लादेशला 105 धावांवर रोखलं.

बांग्लादेशी कॅप्टनने कुठली चूक मान्य केली?

या पराभवानंतर बांग्लादेशचा कॅप्टन नजमुल हुसैन शांतोने प्रामाणिकपणे काही गोष्टी कबूल केल्या. “मला वाटतं आम्ही चांगली गोलंदाजी केली. बॉलिंग युनिट म्हणून आम्ही अनेक चांगल्या गोष्टी केल्या. पण फलंदाजी युनिट म्हणून आम्ही काही चूका केल्या, खासकरुन मधल्या ओव्हर्समध्ये. पहिल्या सहा ओव्हर्समध्ये वेगाने धावा बनवण्याची योजना होती. सुरुवातीला विकेट गमावले, तर आम्ही सामान्यपणे खेळणार होतो. पण आम्ही प्लानची अमलबजावणी करु शकलो नाही” असं नजमुल हुसैन शांतो म्हणाला.

बांग्लादेशी कॅप्टन कशावर कारण देऊ नये म्हणाला?

“संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगली गोलंदाजी केली. खासकरुन टीममध्ये आलेला नवीन प्लेयर रिशादने चांगली गोलंदाजी केली. मला त्याच्या कामगिरीचा आनंद आहे. फिल्डिंग युनिट म्हणून सुद्धा आम्ही चांगली कामगिरी केली. काही चांगल्या कॅचेस घेतल्या. बॅटिंग युनिट म्हणून आम्हाला बरीच सुधारणा करण्याची आवश्यकता आहे” असं नजमुल हुसैन शांतो म्हणाला. “पुढे जाताना आम्हाला आमच्या फलंदाजीबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे” पावसामुळे विलंब झाल्याच्या मुद्यावर म्हणाला की, ‘असं होतं, पण आम्ही त्यासाठी कारण देऊ शकत नाही’

Non Stop LIVE Update
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.