AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2027 स्पर्धेसाठी कर्णधाराच्या नावाची घोषणा, 28 वर्षीय खेळाडूवर मोठी जबाबदारी

ICC ODI World Cup 2027: आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेला तसं पाहिलं तर दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. मात्र सर्वच क्रिकेट बोर्डांनी आतापासूनच सुरूवात केली आहे. जेतेपदाचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून एका क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

World Cup 2027 स्पर्धेसाठी कर्णधाराच्या नावाची घोषणा, 28 वर्षीय खेळाडूवर मोठी जबाबदारी
World Cup 2027 स्पर्धेसाठी कर्णधाराच्या नावाची घोषणा, 28 वर्षीय खेळाडूवर मोठी जबाबदारीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 05, 2026 | 6:13 PM
Share

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांकडे आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार आहेत. असं असताना या स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डानेही या स्पर्धेसाठी 20 खेळाडूंची नावं निश्चित केली असून त्यांची चाचपणी केली जात आहे. त्यापैकी 15 खेळाडूंची निवड अंतिम केली जाईल. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत उतरणार आहे. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही आपली तयारी आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघाच्या कर्णधाराची घोषणा केली आहे. इतकंच काय तर 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी कर्णधार निवडला आहे.

मेहदी हसन मिराज कर्णधार

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने अष्टपैलू मेहदी हसन मिराज यांची वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या मते, कर्णधाराला या स्पर्धेसाठी मोठा कालावधी मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला संघ बांधणी करताना अडचण येणार नाही. मेहदी हसन मिराजला मागच्या वर्षी वनडे संघाचं कर्णधारपद दिलं होतं. आता त्याच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मेहदी हसन मिराजच्या कर्णधारपदाखाळी संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ऑक्टोबर 2025 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि मार्च 2026 मध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट ऑपरेशन्स चेअरमन नजमुल आबेदिनने सांगितलं की, मेहदीने जवळपास एक वर्ष संघाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याला वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे संघाची बांधणी आणखी मजबूत होईल. दुसरीकडे, विकेटकीपर फलंदाज लिटन दास याला 2028 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. लिटन दासला कर्णधारपदाची धुरा टी20 वर्ल्डकप 2026 पर्यंत सोपवली होती. पण बांगलादेशने या स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यामुळे त्याला आणखी दोन वर्षांचा अवधी दिला आहे.

Follow Us
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष....
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची....
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.