World Cup 2023 | वर्ल्ड कपआधी एका मोठ्या टीमच्या प्लेयरकडून निवृत्ती जाहीर, निर्णयाची घोषणा करताच रडला
World Cup 2023 | इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या प्लेयरने एकूण 25 सेंच्युरी झळकवल्या आहेत. एकाच ग्राऊंडवर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. पराभवानंतर 24 तासांच्या आत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात सध्या सर्वच टीम्स वनडे वर्ल्ड कप 2023 ची तयारी करतायत. दुसऱ्याबाजूला क्रिकेट विश्वातील एका मोठ्या टीमला वर्ल्ड कपआधी झटका बसलाय. एका मोठ्या टीमच्या कॅप्टनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय. स्फोटक ओपनर म्हणून त्याची ओळख होती. गुरुवारी पत्रकार परिषदेत त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. रिटायरमेंट जाहीर करताना हा खेळाडू खूप इमोशनल झाला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.
बांग्लादेशचा कॅप्टन तमीम इकबालने निवृत्ती जाहीर केली. तो बांग्लादेशच्या मोठ्या फलंदाजांपैकी एक आहे. तमीमने टेस्ट क्रिकेटमध्ये 10 सेंच्युरीच्या मदतीने 5134 धावा केल्या आहेत.
एकूण किती सेंच्युरी झळकवल्या?
वनडे क्रिकेटमध्ये त्याने 14 सेंच्युरी झळकवल्या. वनडेमध्ये त्याच्या नावावर 8313 धावा आहेत. T20 क्रिकेटमध्येही त्याने एक शतक झळकावलं. T20 मध्ये 1758 धावा केल्या. तमीम इकबालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 25 सेंच्युरी ठोकल्या आहेत.
Tamim Iqbal retires from international cricket.#TamimIqbal #BANvAFG pic.twitter.com/MtGkgpwRAv
— Syed Sami (@SamisDaily) July 6, 2023
सीरीज सुरु असताना निवृत्तीची घोषणा
अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरीज सुरु असताना तमीम इकबालने निवृत्तीची घोषणा केली. चटोग्राम येथे बुधवारी दोन्ही टीम्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये अफगाणिस्तान टीमने 17 धावांनी विजय मिळवला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे या मॅचचा निकाल लागला. बांग्लादेशच्या पराभवानंतर 24 तासांच्या आत तमीम इकबालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. एकाच मैदानावर सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड
तमीम इकबालला बांग्लादेशचा सर्वकालीन महान फलंदाज म्हटल तर चुकीच ठरणार नाही. तमीम इकबालचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्डच हे सर्व काही सांगून जातायत. तमीम इकबालच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डही आहे. तमीम इकबालच्या नावावर एकाच ग्राऊंडवर सर्वाधिक वनडे धावा बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तमीमने शेरे बांग्ला नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सर्वाधिक 2853 धावा केल्या आहेत. या मैदानावर 19 हाफ सेंच्युरी आणि 5 सेंच्युरी झळकवल्या आहेत.
