
आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा याला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडिया आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेद्वारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीची सुरुवात करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने रोहित शर्मा याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहितसाठी हा मोठा झटका समजला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील बीसीसीआय निवड समितीने रोहित शर्मा याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर याबाबत निर्णय करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला 2013 नंतर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत विजयी केलं होतं. त्यामुळे रोहित इंग्लंड दौऱ्यात नेतृत्व करण्यासाठी इच्छूक होता, असा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र आता निवड रोहितला कर्णधारपदी ठेवण्यासाठी तयार नाही.
रोहितला गेल्या 8-9 महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि कर्णधार म्हणून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. रोहितला या दोन्ही भूमिकांना न्याय देता आला नाही. रोहितची ही कामगिरी आणि त्याची आकडेवारी पाहता निवड समितीने हा निर्णय घेतला आहे.
रोहितने 2013 साली कसोटी पदार्पण केलं. रोहितने त्यानंत मागे वूळून पाहिलं नाही. रोहितने आतापर्यंत 12 वर्षांत कसोटी किकेटमध्ये 67 सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने 4351 धावा केल्या. रोहितने या दरम्यान 12 शतकं झळकावली. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च खेळी ठरली. तसेच रोहितने 2 विकेट्सही घेतल्यात.
दरम्यान निवड समितीने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर भारतीय संघाचं नेतृत्व कुणाला करण्यात येणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा सलामीवीर शुबमन गिल हे दोघे कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे निवड समिती आणि टीम मॅनेजमेंट कुणावर विश्वास दाखवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.