AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Agarkar: हार्दिकला वगळून सूर्याच कॅप्टन का? निवड समिती अध्यक्ष म्हणाले….

Ajit Agarkar On T20i Captaincy: सूर्यकुमार यादवला बीसीसीआयने टीम इंडियाची टी20i कॅप्टन्सी दिली. हार्दिक पंड्याला डच्चू दिल्याने त्याच्यावर अन्याय झाल्याचा सूर क्रिकेट चाहत्यांचा आहे.

Ajit Agarkar: हार्दिकला वगळून सूर्याच कॅप्टन का? निवड समिती अध्यक्ष म्हणाले....
Surya Hardik and agarkar
| Updated on: Jul 22, 2024 | 11:13 AM
Share

टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला 27 जुलैपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादव याला रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टी20i कॅप्टन करण्यात आलं. टीम इंडियाचा हार्दिक पंड्या हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत होता, तसेच तो प्रबळ दावेदारही होता. मात्र 2021 मध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादव याला कॅप्टन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच बीसीसीआयने सूर्यकुमारला कॅप्टन करुन हार्दिकवर अन्याय केल्याचं नेटकरी म्हणत होते. अनुभवी हार्दिकला वगळून सूर्यालाच कॅप्टन का केलं? या अनेकांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी उत्तर दिलंय.

अजित आगरकर काय म्हणाले?

“सूर्यकुमार यादवला कर्णधार करण्यात आलं, कारण तो पात्र उमेदवारांपैकी एक आहे. तो सर्वोत्तम T20I बॅट्समन आहे. आम्हाला असा कॅप्टन हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पंड्या याचा फिटनेस हा त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे”, असं आगरकर यांनी म्हटलं. आगरकर यांनी सूर्याला कॅप्टन करण्याचं स्पष्टीकरण देऊन या विषयाला पूर्णविराम लावला. गौतम गंभीर यांची हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं.

हार्दिकसाठी त्याचा फिटनेस डोकेदुखी ठरली आहे. हार्दिकला गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने दुखापत झाली आहे. हार्दिकला त्यामुळे दुखापतीवर मेहनत घ्यावी लागते. परिणामी टीम इंडियाला जेव्हा पंड्याची जेव्हा अधिक गरज असते, तेव्हाच तो उपलब्ध नसतो. हार्दिकला वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली. त्यानंतर तो अनेक महिने टीम इंडियापासून दूर होता. त्यामुळे कॅप्टन्सीबाबत हार्दिकला त्याच्या फिटनेस दगा दिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हार्दिक म्हणून कॅप्टन नाही

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा

दरम्यान टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिका 3-3 सामन्यांच्या असणार आहेत. सूर्यकुमार टी20i सीरिजमध्ये नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.