AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI Selection Committee : बीसीआयकडून टीम इंडियाच्या निवड समितीची घोषणा

बीसीसीआयने निवड समितीची घोषणा केली आहे. यामध्ये टीम इंडियासाठी 3 कसोटी आणि 5 वनडे खेळलेल्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली आहे.

BCCI Selection Committee : बीसीआयकडून टीम इंडियाच्या निवड समितीची घोषणा
| Updated on: Jun 19, 2023 | 6:46 PM
Share

मुंबई : बीसीसीआयने महिला निवड समिती आणि ज्युनियर क्रिकेट समितीची घोषणा केली आहे. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने श्यामा डे शॉ यांची भारतीय वरिष्ठ महिला निवड समितीच्या सदस्य म्हणून निवड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्हीएस टिळक नायडू यांची ज्युनिअर महिला निवड समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

श्यामा यांनी भारतासाठी 3 कसोटी आणि 5 वनडे असे एकूण 8 सामने खेळले आहेत.  क्रिकेट करिअरला अलविदा केल्यानंतर ती बंगालची सिलेक्टरही होती. डावखुऱ्या फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज, शॉने तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. 1985 ते 1997 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व केलं आणि नंतर 1998 ते 2002 पर्यंत रेल्वेकडून खेळल्या होत्या.

व्हीएस टिळक नायडू यांनी 1998-99 ते 2009-10 दरम्यान कर्नाटक तसेच दुलीप ट्रॉफी आणि देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केलं आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नायडू यांनी 93 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4386 धावा केल्या आहेत. 2013 ते 2016 या काळात त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे.

दरम्यान, महिला भारतीय संघ डिसेंबरमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहे. वर्षाच्या शेवटला भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबत एक कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जी पुढील वर्षी जानेवारीपर्यंत चालणार आहे.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.