IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋषभ पंत कर्णधार, मालिकेला केव्हापासून सुरुवात?

India a vs South Africa A : दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने अवघ्या काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यातील या 2 सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यानंतर बीसीसीआयनेही संघाची घोषणा केली आहे.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, ऋषभ पंत कर्णधार, मालिकेला केव्हापासून सुरुवात?
Rishabh Pant Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 21, 2025 | 1:48 PM

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20I सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात 4 दिवसांच्या 2 सामन्यांच्या थरार रंगणार आहे. बीसीसीआयने या 2 सामन्यांसाठी इंडिया ए टीमची घोषणा केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

ऋषभ पंतकडे नेतृत्वाची धुरा

या 4 दिवसांच्या 2 सामन्यांमध्ये विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत नेतृत्व करणार आहे. तर साई सुदर्शन याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र काही खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. सर्फराज खान याला वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पहिला सामना कुठे?

उभयसंघातील या मालिकेला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. दोन्ही सामने बंगळुरुत बीसीसीआय सीओईमध्ये होणार आहेत.

पंत दुखापतीनंतर कमबॅकसाठी सज्ज

दरम्यान पंत इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए या  मालिकेतून पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज आहे. पंतला इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पायाला दुखापत झाली होती. पंतला त्या दुखापतीमुळे जवळपास 2 महिने बाहेर रहावं लागलं. मात्र आता पंतचं लवकरच कमबॅक होणार आहे. तसेच पंतला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संधी मिळू शकते.

इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर, बीसीसीआय सीओई

दुसरा सामना, 6 ते 9 नोव्हेंबर, बीसीसीआय सीओई

पहिल्या 4 दिवसीय सामन्यासाठी इंडिया ए टीम : ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटीयन, मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकुर, आयुष बदोनी आणि सारांश जैन.

दुसऱ्या आणि अंतिम 4 दिवसीय सामन्यासाठी इंडिया ए टीम : ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), केएल राहुल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.