AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND : धोनीच्या हुकमी एक्क्याला गंभीरकडून बाहेरचा रस्ता, नेटकरी बोलले खुन्नस काढली

Ruturaj Gaikwad Dropped from Indian T20I Squad : श्रीलंकाविरूद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंजियाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. नवीन हेड कोच गौतम गंभीर याने आपला जुना भिडू सूर्यकुमार यादवकडे कॅप्टनशीप दिली आहे. मात्र टीममधून रुतुराज गायकवाड याला स्थान न दिल्याने जोरदार टीका होत आहे.

SL vs IND : धोनीच्या हुकमी एक्क्याला गंभीरकडून बाहेरचा रस्ता, नेटकरी बोलले खुन्नस काढली
| Updated on: Jul 18, 2024 | 9:24 PM
Share

टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या कोचपदी गौतम गंभीर याची निवड करण्यात आली आहे. गौतन गंभीर कोच असताना टीम इंडिया श्रीलंका टीमविरूद्ध आपला पहिला दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतलाय. श्रीलंकेविरूद्ध टीम इंडिया तीन टी-20 आणि वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे आता टी-20 टीमचे कर्णधारपद देण्यात आलं आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. टीमची घोषणा होण्यापूर्वी रोहित आणि विराट विश्रांती घेणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. टीमची घोषणा झाल्यावर सर्वात धक्कादायक म्हणजे सीएसके संघाचा कर्णधार आणि युवा खेळाडू रुतूराज गायकवाड याला डच्चू देण्यात आलं आहे.

नवीन हेड कोच गौतम गंभीर याने रुतूराज गायकवाड याला टी-20 टीममधून डच्चू दिला आहे. टीम इंडियाच कॅप्टनपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रुतूराजला टीममध्ये जागा न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत. आता झालेल्या झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेतही त्याने दमदार कामगिरी केली होती. इतकंच नाहीतर त्याची मागील सात सामन्यात 356 धावा करत चमकदार कामगिरीही केली आहे.

रुतुराज गायकवाड 356 धावा,यशस्वी जयस्वाल 263 धाव, शुभमन गिल 201 धावा, सूर्यकुमार यादव 197 धावा, हार्दिक पंड्या 158 धावा, शिवम दुबे 156 धावा,रिंकू सिंह 154 धावा, रिषभ पंत 135 धावा, संजू सॅमसन 131 धावा, आण अक्षर पटेल 123 धावा आहेत. त्यामुळे रुतुराजला टीममध्ये जागा न दिल्याने टीम मॅनेजमेंटसह गंभीरवर चाहते नाराज आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गंभीरवर टीका केली आहे. रुतूराज हा सीएसकेचा असल्याने त्याने टीममध्ये जागा न दिल्याचं काहीजण बोलत आहे. गायकवाड हा सीएसके संघाचा कॅप्टन असून माहीचा सर्वात विश्वासू आणि जवळचा मनला जातो. मागील आयपीएलआधी  धोनीने रुतूराजकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ: (India ODI Squad against Sri Lanka)

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, के. एल. राहुल (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ : (India T20I and Squad against Sri Lanka)

सूर्यकुमार यादव (C), शुबमन गिल (VC), जैस्वाल, रिंकू सिंह, रियान पराग, रिषभ पंत (WK), संजू सॅमसन (WK), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.