AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket | बीसीसीआयची सर्वात मोठी घोषणा, आता स्टेडिअममध्ये फुकट एन्ट्री

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलसाठी स्टेडिअममध्ये फुकट एन्ट्री मिळणार आहे.

Cricket | बीसीसीआयची सर्वात मोठी घोषणा, आता स्टेडिअममध्ये फुकट एन्ट्री
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 01, 2023 | 10:33 PM
Share

मुंबई : आयपीएलचं बिगुल वाजलं असून वुमन्स प्रीमियर लीगचं पहिलं पर्व येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे.  अशातच वुमन्स आयपीएलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा म्हणून बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समजत आहे. आयपीएल आता फुकट पाहता येणार आहे. विश्वास बसणार नाही पण खरं आहे. महिला आणि मुलींना स्टेडियममध्ये विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे. तर पुरूषांना नाममात्र तिकीटाचा दर ठेवण्यात आला आहे.

वुमन्स आयपीएलचे सर्व सामने मुंबईतील मैदानांवर होणार आहेत. पहिल्या पर्वाचा एक भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. यामध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लन, बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आणि कियारा अडवाणी हे परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. मुंबई (Mumbai Indians) आणि गुजरात (Gujarat Giants) यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार असून सामन्यांची तिकीटे ‘बुक माय शो’वरही बुक करता येणार आहेत. महिलांना फ्री असून पुरूषांच्या तिकीटांची किंमत 100 ते 400 पर्यंत इतकी ठेवण्यात आली आहे.

आताच मागे काही दिवसांमागे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. वानखेडे स्टेडियमवर जवळपास 35000 प्रेक्षकांची उपस्थिती होती. वुमन्स आयपीएलचे सर्व सामने मुंबईत खेळवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादासाठी बीसीसीआय असे निर्णय घेताना दिसत आहे. त्यासोबतच मुलींची क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठं पाऊल उचलल्यासारखं आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच