AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 साठी BCCI च्या ‘प्लॅन B’ मध्ये UAE ला स्थान नाही, यजमानपदासाठी दोन देशांची नावे पुढे

IPL चा नवा मोसम सुरु होण्यास अगदी काहीच महिने बाकी आहेत. पण, जगभरात कोरोनाने (Covid-19) धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे.

IPL 2022 साठी BCCI च्या ‘प्लॅन B’ मध्ये UAE ला स्थान नाही, यजमानपदासाठी दोन देशांची नावे पुढे
BCCI (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 10:51 AM
Share

मुंबई : IPL चा नवा मोसम सुरु होण्यास अगदी काहीच महिने बाकी आहेत. पण, जगभरात कोरोनाने (Covid-19) धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. गेल्या वर्षी देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन भारतातच केले. मात्र अनेक खेळाडूंना कोरोना झाल्यामुळे स्पर्धा अर्धी झालेली असतानाच स्थगित करावी लागली. त्यानंतर काही महिन्यांनी बीसीसीआयने यूएईत या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले. आता जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आता आयपीएल (IPL 2022) च्या 15 व्या हंगामात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आधीच प्लॅन बी वर काम करत आहे.

एप्रिलपर्यंत भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर बीसीसीआय पुन्हा एकदा परदेशात या स्पर्धेचे आयोजन करू शकते. पण तो परदेशी देश UAE नसेल. यावेळी बीसीसीआयच्या प्लॅन बीमध्ये ज्या दोन देशांची नावे पुढे येत आहेत, त्यापैकी एक दक्षिण आफ्रिका आणि दुसरा श्रीलंका आहे. दक्षिण आफ्रिकेला 2009 मध्ये एकदाच बीसीसीआयची टी-20 लीग आयोजित करण्याचा अनुभव आला आहे.

UAE शिवाय पर्याय शोधावे लागतील : BCCI

भारतातील कोरोनाच्या बिघडलेल्या स्थितीत गेल्या 2 वर्षांपासून बीसीसीआयच्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांसाठी UAE ही पहिली पसंती आहे. तिथे आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा खेळवण्यात आला. त्यानंतर 2021 चा टी-20 विश्वचषकही तिथेच आयोजित करण्यात आला होता. पण, आता BCCI ने UAE व्यतिरिक्त ठिकाणाच्या इतर काही पर्यायांवर विचार सुरू केला आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही एकट्या यूएईवर नेहमीच अवलंबून राहू शकत नाही. इतर पर्याय शोधावे लागतील. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वेळेतील फरक खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांनाही खूप अनुकूल असेल.

म्हणून दक्षिण आफ्रिका योग्य पर्याय

भारत दक्षिण आफ्रिकेच्या वेळेपेक्षा 3 तास 30 मिनिटे पुढे आहे. म्हणजे पहिला चेंडू दक्षिण आफ्रिकेत संध्याकाळी 4 वाजता टाकला जाईल, तेव्हा भारतात संध्याकाळचे 7:30 वाजले असतील. त्यामुळे प्रक्षेपणाच्या वेळेवर परिणाम होणार नाही आणि तिथे सामनाही योग्य वेळेत संपेल, त्यामुळे खेळाडूंनाही विश्रांती मिळेल.

आयपीएल 2022 साठी बीसीसीआयच्या प्लॅन बी मध्ये दक्षिण आफ्रिकेचे नाव आघाडीवर आहे कारण अलीकडील उभय देशांमधील (भारत विरुद्ध द. आफ्रिका) मालिका तिथे यशस्वीरित्या संपली आहे. भारत अ संघाचा दौरा असो की वरिष्ठ संघादरम्यान खेळली जाणारी कसोटी मालिका. या दोन मालिकांच्या यशाने बीसीसीआयला यूएईऐवजी दक्षिण आफ्रिकेचा विचार करण्यास भाग पाडले आहे.

जेव्हा टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होणार होता, तेव्हा तिथल्या ओमिक्रॉनच्या लाटेमुळे या मालिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. पण मालिका सुरू झाल्यावर ओमिक्रॉनचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या मालिकेचे यशस्वी यजमानपद भूषवले आहे. आता चांगली बातमी अशी आहे की, ओमिक्रॉनच्या केसेस कमी होत आहेत.

इतर बातम्या

IND vs SA: अजिंक्य रहाणेसाठी शेवटचा चान्स? आज करुन दाखवावच लागेल

Virat Kohli: विराटने स्लीपमध्ये घेतली सुपर्ब कॅच, सुनील गावस्करांनीही केला सलाम, पाहा VIDEO

IND vs SA: अंपायरकडून मोठी चूक, शार्दुल ठाकूरने टाकलं सात चेंडूंच षटक

(BCCI can Move IPL 2022 to South Africa or Sri Lanka because of Rising Covid Cases in India)

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...