AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार यादव कॅप्टन, शुबमनबाबत मोठा निर्णय, कुणाचा समावेश?

Team India Sqaud For Asia Cup 2025 : आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर या आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे टी 20 फॉर्मेटने करण्यात आलं आहे.या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. जाणून घ्या कुणाला संधी मिळाली आणि कुणाला डच्चू?

Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार यादव कॅप्टन, शुबमनबाबत मोठा निर्णय, कुणाचा समावेश?
Team India Sqauad and Ajit AgarkarImage Credit source: Bcci and PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 19, 2025 | 3:14 PM
Share

बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेतून आगामी आणि बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची घोषणा करण्याआधी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात अजित आगरकर आणि टी 20i कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर दोघांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 28 सप्टेंबरला महाअंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांना 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या गटातील 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर अव्वल 2 संघांमध्ये महाअंतिम सामना होईल. टीम इंडिया गतविजेता आहे. त्यामुळे भारतासमोर यंदा आशिया कप ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे.

कुणाला संधी?

सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याचाही समावेश करण्यात आला आहे. तर विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांना संधी देण्यात आली आहे.

यूएईमध्ये आयोजन

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. हे सर्व सामने दुबई आणि अबुधाबीमधील क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.

8 संघ आणि 2 गट

अ गट : भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई

ब गट : बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग

भारतीय संघाचं आशिया कप स्पर्धेतील वेळापत्रक

विरुद्ध यूएई, 10 सप्टेंबर, दुबई

विरुद्ध पाकिस्तान, 14 सप्टेंबर, दुबई

विरुद्ध ओमान, 19 सप्टेंबर, अबुधाबी

असा आहे भारतीय संघ

पाकिस्तानकडूनही संघ जाहीर

दरम्यान आशिया कपसाठी सर्वात आधी पाकिस्तानने संघ जाहीर केला. सलमान अली आगाह या स्पर्धेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर पीसीबी निवड समितीने या संघातून अनुभवी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांना वगळलं आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा आणि रिंकू सिंह.

राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?