
बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेतून आगामी आणि बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाची घोषणा करण्याआधी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात अजित आगरकर आणि टी 20i कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर दोघांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 28 सप्टेंबरला महाअंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांना 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत आपल्या गटातील 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल 2 संघ सुपर 4 साठी पात्र ठरतील. त्यानंतर अव्वल 2 संघांमध्ये महाअंतिम सामना होईल. टीम इंडिया गतविजेता आहे. त्यामुळे भारतासमोर यंदा आशिया कप ट्रॉफी राखण्याचं आव्हान असणार आहे.
सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याचाही समावेश करण्यात आला आहे. तर विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा या दोघांना संधी देण्यात आली आहे.
आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे. हे सर्व सामने दुबई आणि अबुधाबीमधील क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहेत.
अ गट : भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई
ब गट : बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग
विरुद्ध यूएई, 10 सप्टेंबर, दुबई
विरुद्ध पाकिस्तान, 14 सप्टेंबर, दुबई
विरुद्ध ओमान, 19 सप्टेंबर, अबुधाबी
असा आहे भारतीय संघ
🚨 #TeamIndia‘s squad for the #AsiaCup 2025 🔽
Surya Kumar Yadav (C), Shubman Gill (VC), Abhishek Sharma, Tilak Varma, Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Jitesh Sharma (WK), Jasprit Bumrah, Arshdeep Singh, Varun Chakaravarthy, Kuldeep Yadav, Sanju Samson (WK), Harshit Rana,…
— BCCI (@BCCI) August 19, 2025
दरम्यान आशिया कपसाठी सर्वात आधी पाकिस्तानने संघ जाहीर केला. सलमान अली आगाह या स्पर्धेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर पीसीबी निवड समितीने या संघातून अनुभवी जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांना वगळलं आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा आणि रिंकू सिंह.
राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, रियान पराग, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल.