AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयने विराट कोहलीला दिलं उत्तर, पत्रकार परिषदेनंतर वादाला सुरुवात

एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता असं कोहलीने आज पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावर आता बीसीसीआयने उत्तर दिलं आहे.

बीसीसीआयने विराट कोहलीला दिलं उत्तर, पत्रकार परिषदेनंतर वादाला सुरुवात
virat kohli
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 15, 2021 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat kohli) पत्रकार परिषदेनंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विराट कोहलीचा दावा खोडून काढला आहे. कर्णधारपदाच्या विषयावर बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता, कल्पना दिली नाही हा विराटचा दावा बीसीसीआयने (BCCI) फेटाळून लावला आहे. टी-20 कर्णधारपदाच्या एकूणच सर्व विषयावर विराट बरोबर चर्चा झाली होती. सप्टेंबर महिन्यात बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विराट कोहलीशी चर्चा करुन त्याला टी-20 चे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. बीसीसीआय पदाधिकाऱ्याने इंडिया टुडेला ही माहिती दिली.

बैठकीच्यादिवशी सकाळी चेतन शर्मा यांनी विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाबाबतच्या निर्णयाची माहिती दिली होती, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवताना बीसीसीआयकडून संवादाचा अभाव होता असं कोहलीने आज पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावर आता बीसीसीआयने उत्तर दिलं आहे.

गांगुली काय म्हणाला होता? “मी विराट कोहलीला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नको, असं सांगितलं होतं. सौरव गांगुलीने न्यूज १८ सोबत बोलताना हे विधान केलं होतं. विराटने मात्र आज वेगळचं सांगितलं. टी-20 चं कर्णधारपद सोडताना बीसीसीआयमधून कोणी आपल्याला अडवलं नाही. उलट हा निर्णय व्यवस्थित स्वीकारला असं सांगितलं. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतय, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोहली काय म्हणाला? “टी-20 चे कर्णधारपद सोडण्याबाबत मी बीसीसीआयशी संपर्क साधला, त्यावेळी मी माझी बाजू त्यांना सांगितली. माझ्या निर्णयामागे ही कारणं आहेत, हे मी सांगितलं होतं. चांगल्या पद्धतीने हा निर्णय स्वीकारला गेला. मी टी-20 चे कर्णधारपद सोडू नये, असे कोणी मला सांगितले नाही” असे कोहली म्हणाला.

संबंधित बातम्या: Virat kohli press confrence: ‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’ Virat kohli on odi series: ‘खोट्या बातम्या लिहितात त्यांना विचारा’, पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे Virat kohli on odi series: ‘मी वनडे सीरीजसाठी उपलब्ध, रोहितची उणीव जाणवेल’

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...