AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयचा आशिया कप स्पर्धेपूर्वी मोठा निर्णय, कमवणार 400 कोटीहून अधिक रुपये; कसं ते समजून घ्या

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असून आता त्याच्या कमाईत आणखी भर पडणार आहे. कारण आशिया कप स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीसीसीआयची तिजोरीत पैशांचा पाऊस पडणार आहे. नेमकं काय झालं आणि कसं काय ते सर्व जाणून घ्या.

बीसीसीआयचा आशिया कप स्पर्धेपूर्वी मोठा निर्णय, कमवणार 400 कोटीहून अधिक रुपये; कसं ते समजून घ्या
बीसीसीआयचा आशिया कप स्पर्धेपूर्वी मोठा निर्णय, कमवणार 400 कोटीहून अधिक रुपये; कसं ते समजून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Sep 04, 2025 | 4:20 PM
Share

आशिया कप स्पर्धेपूर्वी संसदेत एक बिल पास झालं आणि बीसीसीआयच्या जर्सी स्पॉन्सरला गाशा गुंडाळावा लागला. ऑनलाईन गेमिंग संदर्भातील बिल पास झाल्याने ड्रीम इलेव्हनचा बाजार उठला. त्यामुळे बीसीसीआय आणि ड्रीम 11 यांच्यातील करार रद्द झाला आहे. खरं तर हा करार 2026 पर्यंत होता. पण एका वर्षाआधीच हा करार संपुष्टात आला आहे. आता बीसीसीआय नव्या स्पॉन्सरच्या शोधात आहे. आशिया कप स्पर्धेच्या तोंडावर बीसीसीआयची नव्या स्पॉन्सरसाठी शोधाशोध सुरु झाली आहे. मात्र बीसीसीआयला आपल्या मनासारखा स्पॉन्सर काही मिळालेला नाही. त्यामुळे टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत जर्सीवर विना स्पॉन्सर उतरण्याची शक्यता आहे. अस असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयने टीम इंडियाला स्पॉन्सर करण्यासाठी बेस प्राईस वाढवली आहे. आता जे कोणती कंपनी टीम इंडियाची स्पॉन्सर असेल त्या कंपनीला द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यासाटी 3.5 कोटी रुपये द्यावे लागतील. तर आशिया आणि आयसीसी स्पर्धेसाठी ही रक्कम 1.5 कोटी असेल.

बीसीसीआय आणि ड्रीम इलेव्हनचा मागचा करार पाहता द्विपक्षीय सामन्यासाठी 3.17 कोटी इतकी रक्कम होती. तर आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेच्या प्रत्येक सामन्यासाठी 1.12 कोटी रक्कम निश्चित केली होती. म्हणजेच बीसीसीआयने नव्या करारात ही रक्कम 30 ते 40 लाख रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पाहिलं तर सध्याच्या मार्केट रेटपेक्षा ही रक्कम अधिक आहे. बीसीसीआय द्विपक्षीय सामन्यासाठी जास्त पैसे घेण्याचं कारण म्हणजे कंपनीचं नाव असलेलं जर्सीवरील ठिकाण… हे नाव खेळाडूने परिधान केलेल्या जर्सीच्या छातीवर असतं. पण आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत तसं करता येत नाही. स्पॉन्सरचं नाव खेळाडूंच्या स्लीव्सवर असतं.

बीसीसीआयने नव्या टायटल स्पॉन्सरच्या लिलावासाठी 16 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला कोणीही स्पॉन्सर नसेल. तसेच यावेळी गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू कंपन्यांना अर्ज करता येणार नाही. तर स्पोर्टवियर ब्रँड, इन्शुअरन्स, बँकिंग फायनान्स कंपनी देखील स्पॉन्सर करू शकत नाही हे बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआय तीन वर्षांसाठी स्पॉन्सर शोधत आहे. यात एकूण 130 सामने असतील. यात टी20 वर्ल्डकप 2026, वनडे वर्ल्डकप 2027 या स्पर्धा असतील. बीसीसीआयला या 130 सामन्यातून एकूण 400 कोटीहून अधिक रुपये मिळू शकतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.