Duleep Trophy 2025 : बीसीसीआयवर टीकेचा भडिमार, क्रीडाप्रेमींनी दाखले देत लाज काढली

देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंनी भाग घेतला आहे. मात्र असं असूनही क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण कोट्यवधींची संपत्ती असून लाईव्ह कव्हरेज दाखवू शकत नसतील तर काय फायदा?

Duleep Trophy 2025 : बीसीसीआयवर टीकेचा भडिमार, क्रीडाप्रेमींनी दाखले देत लाज काढली
Duleep Trophy 2025 : बीसीसीआयवर टीकेचा भडिमार, क्रीडाप्रेमींनी दाखले देत लाज काढली
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 28, 2025 | 3:39 PM

गल्लीबोलातील क्रिकेट सामने हल्ली युट्यूबवर लाईव्ह दाखवले जातात. एखाद्या व्यावसायिक क्रिकेटप्रमाणे हे कव्हरेज असते. पण बीसीसीआयकडे कोट्यवधी रुपये असून देखील त्यांना काही जमताना दिसत नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. क्रीडाप्रेमींकडून बीसीसीआयवर टीकेचा भडिमार होत आहे. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यापासून भारतीय क्रीडारसिकांना शेड्युल नसल्याने एकही सामना पाहता आलेला नाही. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटचा आनंद लुटण्याचं मन केलं होतं. पण येथेही क्रीडाप्रेमींच्या पदरी निराशा पडली. कारण या स्पर्धेत दिग्गज खेळाडू खेळत असूनही बीसीसीआय लाईव्ह कव्हरेज करू शकली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयची नेटवर्थ 17860 कोटींची आहे. असं असूनही देशांतर्गत क्रिकेटकडे बीसीसीआयचा पाहण्याचा दृष्टीकोन तोकडा आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू खेळत आहेत. ही देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक आहे. या पर्वात दोन उपांत्यपूर्व सामने खेळले जाणार आहेत. यात नॉर्थ झोनचा सामना ईस्ट झोन आणि सेंट्रल झोनचा सामना नॉर्थ ईस्ट झोनसोबत होणार आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने सप्टेंबरमध्ये होणार आहेत. तर अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. एका चाहत्याने लिहिलं की, या काळात छोटे छोटे टेनिस बॉल स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होतं. बीसीसीआय दुलीप ट्रॉफीचं लाईव्ह कव्हरेज करत नाही हे खूपच लाजिरवाणं आहे. दुलीप ट्रॉफी ही देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा आहे.

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं की, या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रिमिंग होत नाही. चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी नही. तर ही स्पर्धा खेळतात तरी का? फक्त दाखवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. इतकंच काय तर जिल्हा स्तरीय टेनिस बॉल स्पर्धा युट्यूबवर लाइव्ह दाखवल्या जातात.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईस्ट झोनकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि अष्टपैलू रियान पराग खेळत आहेत. नॉर्थ झोनकडून अर्शदीप सिंह आणि यश धुल खेळथ आहेत. तसेच कुलदीप यादव, रजत पाटीदार आणि दीपक चाहरही या स्पर्धेत खेळत आहेत.