AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआयची नाराजी, सर्व काही प्लानप्रमाणे होत असताना समोर आला असा रिपोर्ट

इंग्लंडविरुद्धचा पाचवा सामना भारताला काहीही करून जिंकावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. पण या सामन्यापूर्वी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे पाचवा सामना खेळणार की नाही? असा प्रश्न आहे.

जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआयची नाराजी, सर्व काही प्लानप्रमाणे होत असताना समोर आला असा रिपोर्ट
जसप्रीत बुमराहबाबत बीसीसीआयची नाराजी, सर्व काही प्लानप्रमाणे होत असताना समोर आला असा रिपोर्टImage Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2025 | 5:27 PM
Share

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची विशेष काळजी घेतली जात आहे. वर्कलोड मॅनेजमेंट करत जितका त्रास कमी होईल तितका प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जसप्रीत सलग सामने खेळताना दिसत नाही. त्याला आराम दिला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर बीसीसीआय त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात त्याची निवड केली गेली. पण जसप्रीत बुमराह फक्त तीन सामने खेळणार हे स्पष्ट केलं होतं. आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यापैकी तीन सामन्यात जसप्रीत बुमराह खेळला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत खेळेल की नाही याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये संभ्रम आहे. पाचव्या कसोटीपूर्वी बुमराहच्या वर्कलोडबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला एका कसोटीत फक्त 45 ते 50 षटकं टाकण्याचा सल्ला दिला गेला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 43.4 षटकं टाकली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर 43 षटकं टाकली. त्यानंतर मँचेस्टर कसोटी सामन्यात त्याने 33 षटकं टाकली. त्यामुळे त्याला कमीत कमी षटकं देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. कारण सिडनी कसोटीत त्याने सलग गोलंदाजी केली होती. त्यामुळे दुखापतग्रस्त झाला होता. पण इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटप्रमाणे सर्व काही होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम याने स्पष्ट केलं की, भारताचे सर्व वेगवान गोलंदाज फिट आहेत आणि निवडीसाठी उपलब्ध आहेत. पण प्लेइंग 11 जाहीर होत नाही, तिथपर्यंत जसप्रीत बुमराहबाबत काही सांगता येत नाही.

वृत्तानुसार, बीसीसीआय निवडकर्ते आणि टीम व्यवस्थापनावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. बुमराहबाबत माहिती न घेता त्याला मालिकेत घेतल्याने बीसीसीआय नाराज आहे. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी बुमराह संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध आहे की नाही समजून घ्यायला हवं होतं. काही सामन्यांमध्ये विश्रांती आणि काही सामन्यांमध्ये सहभागी होतो, असं करू नये. बोर्डाला असे वाटते की बुमराहने स्वतःला पूर्णपणे उपलब्ध ठेवावे किंवा त्याने विश्रांती घ्यावी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मँचेस्टर कसोटीसाठी स्वतःला उपलब्ध करून दिल्यानंतर बुमराह पाचव्या कसोटीतून बाहेर पडू शकतो.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?