AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir Fight: गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! तणावपूर्ण स्थिती कशीबशी सोडवली Video

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ओव्हल मैदानात होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. असं असताना गौतम गंभीरचं ओव्हलच्या ग्राउंड स्टाफसोबत भांडण झालं. शेवटी झालं असं की...

Gautam Gambhir Fight: गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! तणावपूर्ण स्थिती कशीबशी सोडवली Video
Gautam Gambhir Fight: गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! तणावपूर्ण स्थिती कशीबशी सोडवली VideoImage Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2025 | 4:07 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि शेवटचा सामना ओव्हल मैदानात होत आहे. हा सामना 31 ऑगस्टला सुरु होणार आहे. हा सामना निर्णायक असल्याने महत्व वाढलं आहे. इंग्लंडने हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका खिशात घालेल. तर भारताने हा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटणार आहे. त्यामुळे हा सामना काहीही करून भारताला जिंकावाच लागणार आहे. पण या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानातून एक बातमी समोर आली आहे. गंभीरचं ओव्हलच्या ग्राउंड स्टाफसोबत भांडण झालं. रिपोर्टनुसार, दोघांमध्ये प्रकरण इतकं विकोपाला गेलं की शेवटी मध्यस्थी करून सोडवावं लागलं. टीम इंडिया 28 जुलैला मँचेस्टरवरून लंडनला पोहोचली. त्यानंतर पहिलं सराव सत्र मंगळवारी म्हणजेच 29 जुलैला सुरु झालं. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक सराव सुविधांबाबत असमाधानी दिसले. त्यामुळे गौतम गंभीर आणि ओव्हलमधील ग्राउंड स्टाफ यांच्यात वाद झाला.

भारतीय संघाला मिळणाऱ्या सुविधांबाबत गौतम गंभीरने नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त आहे. ग्राउंड स्टाफशी बोलता बोलता मोठ्या वादात रुपांतर झालं. गंभीर वारंवार ग्राउंड स्टाफवर बोटं दाखवून ओरडताना दिसला. वृत्तानुसार, वादादरम्यान ओव्हल ग्राउंड स्टाफने गौतम गंभीरविरुद्ध तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे गंभीरचा पारा आणखी चढला आणि रागाच्या भरातच उत्तर दिलं. ‘तुम्ही जाऊन तुम्हाला कोणाला तक्रार करू शकता, पण काय करायचे ते तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही.’ असं थेट बोलला. त्यानंतर काही काळ तणावपूर्ण स्थिती होता. अखेर फलंदाज प्रशिक्षक सीतांशू कोटक आणि उर्वरित सपोर्ट स्टाफला दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागली.

पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले आहे. त्यात इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने कमबॅक केलं. तिसऱ्या सामन्यात भारताचा निसटता पराभव झाला. अवघ्या 22 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडच्या गोलंदाजांची नांगी ठेचली. तसेच त्यांच्या तोंडातून विजयाचा घास खेचून सामना ड्रॉ केला. त्यामुळे मालिकेत 2-1 अशी स्थिती झाली आहे. आता पाचवा कसोटी सामना हा निर्णायक ठरणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.