AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना रद्द होणार नाही! दोन कारणं समजून घ्या

Asia Cup 2025, India vs Pakistan clash : आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक आल्यापासून वातावरण तापलं आहे. कारण 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. त्यामुळे राजकीय पटलावर याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पण हा सामना रद्द होणं कठीण आहे. त्याची काही कारणं आहेत ती जाणून घ्या.

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना रद्द होणार नाही! दोन कारणं समजून घ्या
आशिया कप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना रद्द होणार नाही! दोन कारणं समजून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Jul 29, 2025 | 2:42 PM
Share

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा युएईत होणार असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला भारत पाकिस्तान संघ वेळापत्रकानुसार 14 सप्टेंबरला भिडणार आहेत. पण या सामन्यापूर्वीच राजकीय आणि देशात खळबळ उडाली आहे. कारण ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग 2025 स्पर्धेतही भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही. त्यामुळे भारत पाकिस्तान संघ क्रिकेट मैदानात एकत्र येणार नाहीत अशीच स्थिती आहे. भारतीय क्रीडारसिकांचं म्हणणंही तसंच आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी त्यांची भावना आहे. मिडिया रिपोर्टनुसार, हा सामना रद्द होणं कठीण आहे. एनडीटीव्हीनुसार, एका सूत्राने सांगितले की एसीसी म्हणजेच आशियाई क्रिकेट परिषदेचे म्हणणे आहे की ही दोन संघांमधील मालिका नाही तर बहु-राष्ट्रीय स्पर्धा आहे. भारताने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानला फुकटचे गुण मिळतील आणि ते पुढच्या फेरीत जातील. पण असा निर्णय योग्य ठरणार नाही.

दरम्यान, ही स्पर्धा आयसीसी नाही तर आशियाई क्रिकेट परिषद आयोजित करते. त्यामुळे भारत पाकिस्तान हा सामना रद्द होणं कठीण आहे. सध्या एसीसीचे अध्यक्ष पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आहेत. या स्पर्धेचे अधिकार सोनी नेटवर्कला मिळाले आहेत. आठ वर्षांसाठी 17 कोटी अमेरिकन डॉलरचा हा करार आहे. जवळपास 1475 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना झाला तर सोनी नेटवर्कला फायदा होईल. पण हा सामना रद्द झाला तर ब्रॉडकास्टर आणि उत्पन्नावर थेट परिणाम होईल. इतकंच काय तर 24 एसीसी सदस्यांचंही नुकसान होईल.

जाणून घ्या आशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत

आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. गट अ मध्ये भारतासोबत पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध 14 सप्टेंबरला दुसरा सामना असेल. साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमानविरुद्ध 19 सप्टेंबरला होईल. यानंतर सुपर सिक्स फेरीचे सामने होतील. या फेरीतही भारत पाकिस्तान आमनेसामने येतील. उपांत्य फेरीचं गणित सुटलं की थेट अंतिम फेरीत देखील भिडू शकतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.