AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : इंग्लंडचा माज उतरवल्यानंतर अर्शदीप सिंगने केलं असं काही, पायऱ्या चढताना…

चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडच्या घशातून विजयाचा घास खेचून आणला. खरं तर या सामन्यात भारताचा पराभव होईल असं जवळपास निश्चित होतं. कारण इंग्लंडकडे पहिल्या डावात 311 धावांची आघाडी होती. पण भारताने इंग्लंडच्या गोलंदाजांची जिरवल्यानंतर अर्शदीप सिंगने केलं असं काही...

Video : इंग्लंडचा माज उतरवल्यानंतर अर्शदीप सिंगने केलं असं काही, पायऱ्या चढताना...
Video : इंग्लंडचा माज उतरवल्यानंतर अर्शदीप सिंगने केलं असं काही, पायऱ्या चढताना...Image Credit source: Punjab Kings/ X
| Updated on: Jul 28, 2025 | 9:13 PM
Share

इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना ड्रॉ करणं म्हणजेच विजयासारखं आहे. कारण इंग्लंडकडे पहिल्या डावात 311 धावांची आघाडी होती. तसेच भारताला सर्वबाद करण्यासाठी दोन दिवसात पाच सत्रांचा खेळ शिल्लक होता. भारताला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले होते. तेव्हा भारताचं खातंही खुललं नव्हतं. त्यामुळे आता हा सामना हातून गेला असंच वाटत होतं. कारण 311 धावांचा करायच्या आणि त्यात ऋषभ पंतही जखमी होता. त्यामुळे भारत हा सामना गमवेल असंच वाटत होतं. पण चौथ्या दिवशीचा खेळ केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांनी खेळू काढला. पाचव्या दिवशीच्या सुरुवातील केएल राहुल 90 धावा करून बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल 103 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे आता विकेटची लाईन लागेल अशीच स्थिती होती. पण अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चांगलंच झुंजवलं आणि सामना ड्रॉ केला. हा सामना ड्रॉ झाला तरी विजयासारखाच होता. यामुळे भारतीय खेळाडू आणि क्रीडाप्रेमी प्रचंड खूश होते. अर्शदीप सिंगचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मँचेस्टर कसोटीच्या ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यावर चढताना डान्स करताना दिसला.

अर्शदीप सिंग आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर प्रचंड खूश होता. त्यामुळे पायऱ्यांवर भांगडा करताना दिसला. हा व्हिडीओ पंजाब किंग्सने आपल्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मँचेस्टरमधील मूड’. या व्हिडीओला अनेक लोकांनी लाईक आणि कमेंट केले आहेत. अर्शदीप सिंगला या कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या तीन कसोटीत त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. तर चौथ्या कसोटीत जखमी असल्याने बाहेर बसावं लागलं. पण पाचव्या कसोटीत त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळू शकते.

भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, भारताचे सर्व वेगवान गोलंदाज फिट आहेत आणि चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. शार्दुल ठाकुरची कामगिरी काही खास राहिली नाही. त्याला एकही विकेट मिळाली नाही. दुसरीकडे, अंशुल कंबोजही प्रभावी ठरला नाही. पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार की नाही हे देखील गुलदस्त्यात आहे. असं सर्व समीकरण पाहता अर्शदीप सिंगला पदार्पणाची संधी मिळू शकते. भारताला पाचवा कसोटी सामना काहीही करून जिंकावा लागेल. अन्यथा मालिका इंग्लंडच्या खिशात जाईल.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.