AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियासाठी बीसीसीआयचा स्पेशल व्हिडिओ, रोहित शर्मा, विराट कोहली अन् टीम….

T20 world Champion Team India Arrives Delhi: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण टीम इंडियातील खेळाडू ट्रॉफीसह दिसून येत आहेत. रोहित शर्मा ट्रॉफीसोबत जल्लोष करतानाही दिसत आहे.

टीम इंडियासाठी बीसीसीआयचा स्पेशल व्हिडिओ, रोहित शर्मा, विराट कोहली अन् टीम....
रोहित, विराट ट्रॉफीसोबत
| Updated on: Jul 05, 2024 | 7:04 AM
Share

T20 world Champion Team India Arrives Delhi: टी 20 विश्वचषकातील भारतीय संघ मायदेशात दाखल झाला आहे. भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी टीम इंडियाचे फॅन्स मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. भारतीय संघाच्या चाहत्यांकडून इंड‍िया-इंड‍िया अशा घोषणा दिल्या जात होत्या. टीम इंडियाच्या खेळाडूंना स्पेशल बसने विमानतळापासून हॉटेलपर्यंत नेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बीसीसीआयकडून व्हिडिओ शेअर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, विराट कोहलीसह संपूर्ण टीम इंडियातील खेळाडू ट्रॉफीसह दिसून येत आहेत. रोहित शर्मा ट्रॉफीसोबत जल्लोष करतानाही दिसत आहे. काही तासांत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याला हजारो जणांना लाइक अन् कॉमेंट केल्या आहेत. या व्हिडिओनंतर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे कौतूक करण्यात आले आहे. It’s home असे दोन शब्दांचे कॅप्शन बीसीसीआयने व्हिडिओ ट्विट करताना दिले आहे.

यामुळे टीम इंडियाला उशीर

बारबाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 29 जून रोजी 7 धावांनी पराभव केला. त्यानंतर 17 वर्षांनी भारतीय संघाने विश्वविजेतपदावर नाव कोरले. वेस्ट इंडिजमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे सर्व विमाने बंद होती. विमानतळावरील सर्व ऑपरेशनही बंद होते. त्यामुळे 30 जून ते 3 जुलैपर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिजमधील हॉटेलमध्येच अडकला होता. चक्रीवादळ शांत झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना आणण्यासाठी विशेष विमान पाठवले. त्या विमानाने भारतीय संघ 4 जुलै रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाला. आता गुरुवारी भारतीय संघाची विजयी मिरवणूक मुंबईतून निघणार आहे.

रोहित शर्माच्या टीम इंडियाचा कार्यक्रम

  • 06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन
  • 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन
  • 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान
  • 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ
  • 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान
  • दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान
  • 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान
  • 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन
  • 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन
  • 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक
  • 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ
  • 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.