Stampede in Bangalore : बंगळुरुत चेंगराचेंगरी, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत म्हणाले…

Bcci Rajiv Shulka Reaction On Stampede In Bangalore : बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर आता राजकारण पेटलं आहे. भाजपकडून सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Stampede in Bangalore : बंगळुरुत चेंगराचेंगरी, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत म्हणाले...
Bcci Rajiv Shulka Reaction On Stampede In Bangalore
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 04, 2025 | 8:01 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रजत पाटीदार याच्या नेतृत्वाच अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. आरसीबीने 18व्या वर्षी आयपीएल ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या या विजयासह विराट कोहली आणि असंख्य चाहत्यांचं स्वप्न पूर्ण झालं. चाहत्यांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या खेळाडूंचं दुसऱ्या दिवशी अर्थात 4 जून रोजी घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सत्कार समारंभाचं आयोजन करण्यातं आलं होतं. मात्र या क्रार्यकमाला गाळबोट लागलं. स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे या चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला. तर 30 पेक्षा अधिक जणांना दुखापत झाली आहे. या सर्व प्रकारानंतर आता राजकारण रंगलंय. विरोधकांककडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यानंतर आता बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या दुर्घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.

राजीव शुक्ला काय म्हणाले?

मोठ्या प्रमाणात लोकं जमली होती. गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. अशाप्रकारची गर्दी होईल, याचा अंदाज फ्रँचायजीलाही नव्हता. ही दुर्घटना अचानकपणे झाली आहे. या दुर्घटनेमुळे अनेकांना दु:ख झालंय. मी या प्रकरणात कर्नाटक सरकारसह, पोलिसांसह फ्रँचायजीसह संपर्कात आहे. त्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगू”, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना दिली.

बीसीसीआय उपाध्यक्षांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन काय म्हणाले?

राजीव शुक्ला यांना या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असं सांगून प्रश्न करण्यात आला. यावरही शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली. यात राजीनाम्याचा मुद्दाच येत नाही. या दुर्घटनेला राजकीय रंग देण्याची गरजच नाही.