AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill IPL 2023 Final : Prithvi Shaw वर शुभमन गिलच्या कोचचा वार, ‘तो स्वत:ला…’

Shubman Gill IPL 2023 Final : शुभमन गिलच्या कोचने पृथ्वी शॉ बद्दल धक्कादायक वक्तव्य केलय. शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांची तुलना होणं स्वाभाविक आहे. कारण अंडर-19 मध्ये दोघे एकत्र क्रिकेट खेळले. त्याशिवाय टीम इंडियातील त्यांचा प्रवासही जवळपास सारखाच आहे.

Shubman Gill IPL 2023 Final : Prithvi Shaw वर शुभमन गिलच्या कोचचा वार, 'तो स्वत:ला...'
Shubman Gill-Prithvi ShawImage Credit source: PTI
| Updated on: May 28, 2023 | 10:53 AM
Share

मुंबई : गुजरात टायटन्सने शुक्रवारी रात्री IPL 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. क्वालिफायर-2 च्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 62 धावांनी विजय मिळवला. गुजरातने पहिली बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 बाद 233 धावा केल्या. शुभमन गिल या मॅचमध्ये हिरो ठरला. त्याने 60 चेंडूत 129 धावा फटकावल्या. गतविजेत्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा डाव 171 धावांवर संपवला. गुजरातकडून मोहित शर्माने 5 विकेट घेतल्या.

शुभमनचा परफॉर्मन्स पाहून सर्वांच्याच तोंडून कौतुकाचे शब्द बाहेर पडले. 23 वर्षाच्या शुभमन गिलने 10 सिक्स आणि 7 फोर मारले. शुभमनने 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्यानंतरच्या 50 धावा त्याने फक्त 17 चेंडूत केल्या.

चेन्नईचा खेळाडू ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत गिलपेक्षा किती मागे?

गुजरात टायटन्सचा हा खेळाडू चालू IPL 2023 सीजनमधील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. शुभमन गिलच ऑरेन्ज कॅपचा मानकरी ठरु शकतो. कारण ऑरेन्ज कॅपच्या शर्यतीत असलेला चेन्नई सुपर किंग्सचा प्लेयर त्याच्यापेक्षा 200 धावांनी पिछाडीवर आहे.

WTC मधील परफॉर्मन्सकडे लक्ष

टीम इंडियाकडून खेळताना शुभमन गिलने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतकी खेळी साकारल्या आहेत. यावर्षाच्या सुरुवातीला शुभमनने वनडेमध्ये डबल सेंच्युरी झळकवली होती. पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. त्यावेळी शुभमन कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंगला येईल. 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान फायनलचा सामना रंगणार आहे.

पृथ्वी शॉ बद्दल धक्कादायक वक्तव्य

शुभमन गिलचे बालपणीचे कोच करसन घावरी यांनी पृथ्वी शॉ बद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांची तुलना होणं स्वाभाविक आहे. कारण अंडर-19 मध्ये दोघे एकत्र क्रिकेट खेळले. त्याशिवाय टीम इंडियातील त्यांचा प्रवासही जवळपास सारखाच आहे. 2018 साली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी शुभमन आणि पृथ्वी शॉ एकाच टीममध्ये होते.

पृथ्वीला IPL 2023 चा सीजन लक्षात ठेवायला नाही आवडणार

शुभमन गिल आता सर्वच फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचा अविभाज्य भाग बनलाय. त्याचवेळी पृथ्वी शॉ ला टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पृथ्वी शॉ ला आयपीएल 2023 चा सीजन लक्षात ठेवायला अजिबात आवडणार नाही. त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 8 सामन्यात फक्त 106 धावा केल्या.

‘ते दोघे वेगवेगळ्या वर्गात मोडतात’

“2018 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघात दोघे होते. आचा शुभमन गिल कुठे आहे? आणि पृथ्वी शॉ कुठेय? ते दोघे वेगवेगळ्या वर्गात मोडतात” असं करसन घावरी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.

‘आऊट करण्यासाठी एक चेंडू पुरेसा’

“पृथ्वी शॉ स्वत:ला स्टार समजतो. कोणीही आपल्याला टच करु शकत नाही, असं त्याला वाटतं. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, तुम्ही T20, 50 ओव्हर्स, टेस्ट मॅच किंवा रणजी ट्रॉफीमध्ये खेळा, तुम्हाला आऊट करण्यासाठी एक चेंडू पुरेसा असतो” असं करसन घावरी म्हणाले. “तुमच्याकडे शिस्त आणि चांगला स्वभाव आवश्यक आहे. तुम्ही स्वत:वर मेहनत घेतली पाहिजे. तम्ही या गोष्टी केल्या, तर जास्त धावा निघतील” असं घावरी म्हणाले. शुभमनचे कोच पृथ्वी शॉ बद्दल चांगलं सुद्धा बोलले

करसन घावरी यांनी पृथ्वी शॉ वर फक्त टीकाच केली नाही. त्यांनी काही चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितल्या. “शुभमन आणि पृथ्वी दोघे सारख्या वयाचे आहेत. अजून काही बिघडलेलं नाही. गिलने त्याच्यामध्ये ज्या कमतरता होत्या, त्यावर काम केलं. शॉ ने तसं केलं नाही. पृथ्वी त्याच्या कमतरताने मेहनतीने दूर करु शकतो. त्याला मेहनत घ्यावी लागेल. अन्यथा क्षमता असूनही उपयोग नाही” असं करसन घावरी म्हणाले. करसन घावरी माजी वेगवान गोलंदाज असून ते टीम इंडियाकडून खेळले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.