AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20i World Cup 2026 : भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान वर्ल्ड कपसाठी या खेळाडूची टीममध्ये निवड, कोण आहे तो?

Icc T20i World Cup 2026 : टीम इंडिया विरूद्धच्या टी 20i मालिकेचा थरार सुरु असताना पाहुण्या न्यूझीलंडने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात युवा गोलंदाजाचा समावेश केला आहे. जाणून घ्या सविस्तर.

T20i World Cup 2026 : भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान वर्ल्ड कपसाठी या खेळाडूची टीममध्ये निवड, कोण आहे तो?
India vs New Zealand T20iImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 30, 2026 | 9:11 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेत पहिले आणि सलग 3 सामने जिंकले. भारताने यासह मालिका आपल्या नावावर केली. तर न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात पहिला विजय मिळवत भारताला विजयी चौकारापासून रोखलं. न्यूझीलंडने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात चौथा सामना जिंकला. न्यूझीलंडने विशाखापट्टणममध्ये झालेल्या या सामन्यात यजमान टीम इंडियाला 50 धावांनी पराभूत केलं.  टीम इंडिया या मालिकेत 4 सामन्यांनंतर 3-1 ने आघाडीवर आहे. आता पाचवा आणि अंतिम सामना हा शनिवारी 31 जानेवारीला होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी न्यूझीलंड संघात अचानक एका युवा खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

आयसीसीच्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेला (T20i World Cup 2026) 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. त्याआधी न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी टीममध्ये मोठा बदल केला आहे. न्यूझीलंड संघात आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज  बेन सियर्स याचा राखीव म्हणून समावेश केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटकडून सोशल मीडियाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

न्यूझीलंडची ताकद वाढली

बेन सियर्स याच्या समावेशामुळे न्यूझीलंडची ताकद वाढली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य संघातून एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर व्हाव लागलं तरच राखीवपैकी संधी मिळते. त्यामुळे सियर्सला तेव्हाच संधी मिळेल जेव्हा मुख्य संघातील खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झालेला असेल.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्ने याला दुखापत झाली होती. मिल्नेच्या दुखापतीनंतर संघात काइल जेमिसन याचा समावेश करण्यात आला होता. त्यात आता बेनची एन्ट्री झाली आहे. बेन टी 20i वर्ल्ड कपआधी न्यूझीलंड संघासह जोडला जाणार आहे.

बेन सियर्सची टीममध्ये एन्ट्री

बेन सियर्सची टी 20i मधील कामगिरी

दरम्यान बेन सियर्स याने आतापर्यंत न्यूझीलंडचं 22 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. सियर्सने या दरम्यान एकूण 23 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच सियर्स न्यूझीलंडसाठी 4 एकदिवसीय आणि 1 कसोटी क्रिकेट सामनाही खेळला आहे. सियर्सने वनडेत 10 आणि कसोटीत 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?