AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माच्या गैरहजेरीत यशस्वीसोबत सलामीला कोण उतरणार? पुजाराने या नावाला केला विरोध, म्हणाला..

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे पहिल्या कसोटीसाठी गैरहजर असणार आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर दिली आहे. पण टीम इंडियासाठी ओपनिंग कोण करणार? असा प्रश्न आहे. यशस्वी जयस्वालसोबत कोण? असा प्रश्न असताना चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

रोहित शर्माच्या गैरहजेरीत यशस्वीसोबत सलामीला कोण उतरणार? पुजाराने या नावाला केला विरोध, म्हणाला..
| Updated on: Nov 21, 2024 | 4:43 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. पहिलाच सामना पर्थच्या मैदानावर खेळला जाणार असून संघाचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार आहे. जसप्रीत बुमराहची कसोटी कर्णधारपद भूषविण्याची ही दुसरी वेळ आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं होतं. त्यामुळे कर्णधारपदात जसप्रीत बुमराहची कसोटी लागणार आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला कोण येणार असा प्रश्न पडला आहे. कारण शुबमन गिलही दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत सलामीला केएल राहुल येईल असं सांगितलं जात आहे. पण केएल राहुलच्या नावाला चेतेश्वर पुजाराने विरोध केला आहे. चेतेश्वर पुजाराने मीडियाशी बोलताना सांगितलं की, केएल राहुलला सलामीला पाठवू नये. असं सांगत त्याने त्याबाबत काही कारणंही सांगितली.

‘मला फलंदाजीचा क्रम माहिती नाही. पण मला केएल राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवायचं आहे. केएल राहुलला दबावात खेळण्याचा अनुभव आहे.’ असं चेतेश्वर पुजाराने सांगितलं. चेतेश्वर पुजारा बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेचं समालोचन करणार आहे. तसेच मागच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चेतेश्वर पुजाराने कमाल कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या वक्तव्याने क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे.दरम्यान, शुबमन गिलच्या जागी संघात देवदत्त पडिक्कला संधी देण्यात आली आहे. देवदत्त पडिक्कल हा डावखुरा फलंदाज असल्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियात डाव्या आणि उजव्या कॉम्बिनेशनला प्राधान्य दिलं जातं.

चेतेश्वर पुजाराचं विधान काही अंशी खरं देखील असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या सामन्यात केएल राहुल सलामीला उतरला होता. पण दोन्ही डावात त्याला अपयश आलं. केएल राहुलने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 10 केल्या. त्याची खेळी पाहता चेतेश्वर पुजाराच्या म्हणण्याप्रमाणे, तिसऱ्या स्थानावर खेळणं योग्य ठरेल. पण पर्थ कसोटीत केएल राहुल ओपनिंग येईल असच दिसत आहे. कारण त्याच्याशिवाय सध्यातरी संघात दुसरा पर्याय नाही. त्यामुळे केएल राहुल दडपण कसं हाताळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.