AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs SRH : आई गं…. जाडेजा कळवळला, भारतीय खेळाडू बरोबर मोठा वाद झाला असता, पण…Video

CSK vs SRH : आयपीएल येतं, तेव्हा वेगवेगळ्या टीम्सकडून खेळताना हे प्लेयर आपल्याच देशाच्या खेळाडूंना भिडतात. मैदानावरची ही बाचाबाची कधीकधी खूप गंभीर असते. सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात असच काहीस झालं.

CSK vs SRH : आई गं.... जाडेजा कळवळला, भारतीय खेळाडू बरोबर मोठा वाद झाला असता, पण...Video
Ravindra jadeja Image Credit source: AFP
| Updated on: Apr 06, 2024 | 10:08 AM
Share

क्रिकेट मॅचमध्ये प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठी ताकद पणाला लावतो. सहकारी खेळाडूंसोबत मिळून टीम जिंकावी यासाठी प्रयत्न असतो. पण ज्यावेळी आयपीएल येतं, तेव्हा वेगवेगळ्या टीम्सकडून खेळताना हे प्लेयर आपल्याच देशाच्या खेळाडूंना भिडतात. मैदानावरची ही बाचाबाची कधीकधी खूप गंभीर असते. सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यात असच काहीस झालं. भुवनेश्वर कुमारने थेट रवींद्र जाडेजाला चेंडू मारला.

हैदराबादमध्ये शुक्रवारी 5 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना झाला. हैदराबादच्या होम ग्राऊंडवर सामना असून चेन्नईला मोठा सपोर्ट होता. मात्र, तरीही चेन्नईची टीम मोठी धावसंख्या उभारु शकली नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजाने वेगाने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही. अशाच एका प्रयत्नात स्टम्पसच्या दिशेने जोरात केलेला थ्रो बसला.

जाडेजा यामुळे कळवळला

19 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता. जाडेजा चौथ्या चेंडूचा सामना करत होता. भुवनेश्वर कुमारने एकदम परफेक्ट यॉर्कर टाकला. ज्यावर मोठा फटका खेळण्याचा जाडेजाचा प्रयत्न फसला. चेंडू भुवनेश्वर कुमारच्या दिशेने गेला. धाव घेण्याच्या प्रयत्नात जाडेजा क्रीजच्या बाहेर आला. तितक्यात भुवनेश्वरने चेंडू उचलला व जाडेजाला रनआऊट करण्यासाठी स्टम्पसच्या दिशेने थ्रो केला. जाडेजा क्रीजच्या दिशेने पळत होता. तो चेंडूच्या लाइनमध्ये आला. चेंडू जोरात जाडेजाच्या कमरेवर लागला. जाडेजा यामुळे कळवळला.

त्यावरुन मोठा वाद झाला असता

सुदैवाने जाडेजाला गंभीर दुखापत झाली नाही. त्यावेळी दोन्ही अंपायर्सनी चर्चा केली. जाडेजा जाणूनबुजून चेंडू आणि स्टम्पसच्या लाइनमध्ये आला नाही ना. असं असल्यास त्याला बाद ठरवलं असतं. जाडेजा चिडल्याच दिसत होता. त्यावरुन मोठा वाद झाला असता. पण SRH चा कॅप्टन पॅट कमिन्सने अंपायर्सला सांगितलं की, तो अपील करणार नाही. त्यामुळे वाद टळला.

BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.