Sourav Ganguly Biopic : लॉर्ड्सवर पुन्हा टी शर्ट भिरकावणार, दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीच्या भूमिकेत कोण?

| Updated on: Jul 13, 2021 | 3:25 PM

भारतीय क्रिकेटला 'दादागिरी' शिकवणारा माजी कर्णधार सौरव गांगुली अर्थात दादावर बायोपिक तयार करण्यात येणार आहे. सौरवने यासाठी होकार दिला असून त्याच्या लवकरच चित्रपट तयार करण्यास सुरुवात होणार आहे.

Sourav Ganguly Biopic : लॉर्ड्सवर पुन्हा टी शर्ट भिरकावणार, दादागिरी मोठ्या पडद्यावर झळकणार, गांगुलीच्या भूमिकेत कोण?
गांगुलीने नेट-वेस्ट सिरीज जिंकल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत केलेले सेलेब्रेशन
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी कर्णधार, उत्कृष्ट दर्जाचा डावखुरा फलंदाज, आपल्या जोशपूर्ण खेळीने प्रतिस्पर्ध्यांना गारद करुन सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली (Sourav Ganguly). भारतात सौरवचे करोडो चाहते असून सर्वंचजण त्याच्या जीवनाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण याबाबतची कोणतीच नेमकी माहिती आतापर्यंत समोर आली नव्हती. पण आज अखेर सौरवने स्वत: न्यूज 18 या वृत्तसंस्थेशी बोलताना आपण आपल्या क्रिकेट जीवनावर बायोपिक करण्यास होकार दिला असल्याची माहिती दिली.

गांगुली म्हणाला, ” हो, मी माझ्या जीवनावर बायोपिक बनवण्यास होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार असून आताच दिग्दर्शकाचे नाव सांगू शकत नाही. या सर्वासाठी आणखी काही दिवस जातील” समोर आलेल्या माहितीनुसार ही एक बिग-बजेट फिल्म असणार आहे. एखादे मोठे प्रोडक्शन हाऊस तयार करणार असलेल्या या चित्रपटाचे बजेट जवळपास 200 ते 250 कोटीच्या घरात असेल. सौरवने  दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे लेखन अजून सुरु असून निर्माते आणि गांगुली यांच्यात मीटिंग्स सुरु आहेत.

गांगुलीच्या रोलसाठी ‘हा’ अभिनेता जवळपास निश्चित

सौरव गांगुलीचे मैदानावरील वावरणे अगदी अंग्री यंग मॅनसारखे होते. त्यामुळे त्याच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याबद्दल बोलताना गागुंलीने रणबीर कपूरचे नाव जाहिर केले आहे. तसेच आणखी दोन हिरोंबाबतही विचार होत असल्याचं त्याने सांगितंल. या चित्रपटात गांगुलीची संपूर्ण क्रिकेट कारकिर्द अगदी पदार्पणापासून ते आता बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष होण्यापर्यंत दाखवण्यात येणार आहे.

क्रिकेटपटूंवरील बायोपिक

आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या जीवनावर बायोपिक तयार करण्यात आले असून यातील सुशांत सिंग राजपूतने साकरलेल्या एम एस धोनीचा बायोपिक सर्वांत हिट ठरला आहे. तसेच मोहम्मद अझराऊद्दीनचा इम्रान हाश्मीने साकारलेले बायोपिकही चांगला गाजला. सचिन तेंडूलकरच्या जीवनावरही डॉक्यूमेंटरी तयार करण्यात आली आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयावर 83 ही फिल्म तयार होत आहे. ज्यात कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. यासोबतच काही दिवसांपूर्वी भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर चित्रपट येणार असल्याचेही निश्चित झाले आहे. झुलनच्या भूमिकेत अनुष्का शर्मा असणार आहे.

हे ही वाचा :

Photo : इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचा डंका, जगातील सर्वांत प्रभावशाली खेळाडूंमध्ये तिसरा, ‘हे’ आहेत Top 5

BREAKING: 1983 विश्वचषकाचे हिरो यशपाल शर्मा कालवश, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Dilip Kumar Death : दिलीप कुमार यांच्या शिफारसीने मिळाला ‘या’ क्रिकेटपटूला ब्रेक, विश्वचषक विजेत्या संघातही दमदार कामगिरी

(Biopic On Sourav Ganguly Will Start Shooting soon Ganguly Agrees For his Biopic Ranbir Kapoor Will Play his Role in FIlm)