AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : हार्दिक मुंबईच्या पराभवानंतर बुमराहचं नाव घेत स्पष्टच म्हणाला

Hardik Pandya on Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 क्वालिफायर-2 या निर्णायक सामन्यात विकेट्स घेण्यात अपयशी ठरला. मुंबईच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने बुमराहबाबकत काय सांगितलं? जाणून घ्या.

PBKS vs MI : हार्दिक मुंबईच्या पराभवानंतर बुमराहचं नाव घेत स्पष्टच म्हणाला
Hardik Pandya on Jasprit BumrahImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 02, 2025 | 3:40 AM
Share

मुंबई इंडियन्सला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल 2025  क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्सकडून पराभूत व्हावं लागलं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने पहिले बॅटिंग करताना 203 धावांपर्यंत मजल मारली. तर पंजाबने प्रत्युत्तरात कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेल्या नाबाद खेळीच्या जोरावर 6 बॉलआधी विजय मिळवला. पंजाबने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 207 रन्स केल्या आणि अंतिम फेरीत धडक दिली. मुंबईचं यासह अंतिम फेरीत पोहचण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.

हार्दिक श्रेयसबाबत काय म्हणाला?

हार्दिकने पंजाबसाठी सर्वाधिक आणि नाबाद 87 धावा करणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यर याचं कौतुक केलं. “श्रेयसने ज्या पद्धतीने बॅटिंग केली ते कौतुकास्पद आहे. श्रेयसने संधीचा फायदा घेतला आणि अप्रतिम फटके मारले. माझ्या हिशोबाने हा बरोबरीचा सामना होता. आम्ही धावसंख्या उभारली होती. मात्र बॉलिंगद्वारे आम्हाला चांगली कामगिरी करण्याची गरज होती. ही अशी कामगिरी मोठ्या सामन्यात खरंच निर्णायक ठरते”, असं हार्दिकने म्हटलं.

“पंजाबचे फलंदाज खरंच शांत होते. त्यांनी आम्हाला दबावात ठेवलं. मला वाटतं की आम्हाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मी खेळपट्टीवर खापर फोडणार नाही. मी जर गोलंदाजांचा योग्य वापर केला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. मागे वळून पाहिलं तर सामन्याचा निकाल वेगळा असू शकता”, असं म्हणत हार्दिक पंड्या याने खंत व्यक्त केली.

मुंबई इंडियन्स पराभूत

बुमराहबद्दल काय म्हणाला?

जसप्रीत बुमराहला या सामन्यात 16 वी ओव्हर टाकायला दिली नाही. हार्दिकला यावरुनच प्रश्न करण्यात आला. पंजाबला 24 बॉलमध्ये 41 धावांची गरज असताना बॉलिंग द्यायला हवी होती का? असा प्रश्न हार्दिकला करण्यात आला. यावर हार्दिक म्हणाला की, “तसं करणं घाईचं झालं असतं. मात्र बुमराहला परिस्थितीचा अंदाज असतो. 18 बॉल बाकी असले तरी जस्सी जस्सी आहे. त्याच्यात खास करण्याची क्षमता आहे. मात्र आज तसं झालं नाही”, असं हार्दिकने नमूद केलं. हार्दिक कर्णधार, फलंदाज आणि गोलंदाज म्हणून अपयशी ठरला. हार्दिकने 13 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. तर 2 ओव्हरमध्ये 19 रन्स दिल्या. मात्र त्यानंतरही हार्दिक बुमराहचं नाव घेण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.