AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, CSK vs MI : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सामना, थोड्याच वेळात होणार टॉस, जाणून घ्या प्लेइंग इलेवन

मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीमच्या गोलंदाजीत आता थोडीफार सुधारणा झालीय.

IPL 2022, CSK vs MI : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सामना, थोड्याच वेळात होणार टॉस, जाणून घ्या प्लेइंग इलेवन
csk vs mi Image Credit source: BCCI
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: May 12, 2022 | 6:44 PM
Share

मुंबई: आज आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होतोय. नेहमी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या (CSK vs MI) सामन्यावर सर्वाधिक नजर असते. यंदाच्या सीजनमध्ये दोन्ही संघांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पण लीगच्या इतिहासातील दोन्ही यशस्वी संघ आहेत. पॉंइंटस टेबलमध्ये मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ तळाला आहेत. मुंबईच, तर स्पर्धेतील आव्हान कधीच संपुष्टात आलय. चेन्नईचा संघ फक्त अपेक्षेवर आहे. त्यांचा प्लेऑफचा (Playoff) मार्ग खूपच खडतर आहे. आज दोन्ही संघ भिडतील. त्यावेळी मुंबई चेन्नईला नमवून त्यांचही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणते की, CSK चं आव्हान अजून काही दिवस टिकून रहात, यावर सगळ्यांच्या नजरा असतील. चेन्नईचा संघ या पुढच्या सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा शिवाय उतरणार आहे. जाडेजा दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे जाडेजा पुढचे सगळेच सामने खेळणार नसल्याची माहिती आहे.

चेन्नई काय बदल करेल?

CSK ने आपल्या मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी मोठया फरकाने विजय मिळवला होता. या सामन्यात जाडेजाच्या जागी शिवम दुबेला संधी देण्यात आली होती. चेन्नईच्या फलंदाजांनी अलीकडच्या सामन्यात चांगलं प्रदर्शन केलं आहे. ड्वेन ब्राव्हो फिट झाल्यामुळे संघाची गोलंदाजी सुद्धा मजबूत झालीय. सीएसके या सामन्यासाठी संघात कुठला बदल करेल, याची शक्यता कमी वाटते.

पोलार्डला आराम मिळणार

मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीमच्या गोलंदाजीत आता थोडीफार सुधारणा झालीय. जसप्रीत बुमराहने तर मागच्या सामन्यात कहर केला. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने केकेआरची वाट लावून टाकली. पण फलंदाजांनी निराश केलं. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. यंदा पॉइंटस टेबलमध्ये दोन्ही संघांनी खूपच खराब प्रदर्शन केलय. चेन्नईकडे फक्त नाममात्र अपेक्षा आहेत. आतापर्यंत चेन्नई आणि मुंबईचा सामना नेहमीच रोमांचक झाला आहे. मागच्या सामन्यात तर धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून चेन्नईला विजय मिळवून दिला होता. पोलार्ड खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला बाहेर बसवलं जाऊ शकतं.

CSK vs MI संभाव्य प्लेइंग – 11

चेन्नई – एमएस धोनी (कॅप्टन), डवेन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सिमरजीत सिंह,

मुंबई – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, संजय वर्मा, टिम डेविड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, रायली मेरेडिथ, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार