Rahul Dravid : साधेपणा तोही इतका…! एका कार्यक्रमात राहुल द्रविड सर्वात मागे बसला, राहुलच्या नम्रपणाचा फोटो व्हायरल

Rahul Dravid : साधेपणा तोही इतका...! एका कार्यक्रमात राहुल द्रविड सर्वात मागे बसला, राहुलच्या नम्रपणाचा फोटो व्हायरल
राहुल द्रविड
Image Credit source: social

भारतीय क्रिकेट संघाला अनेक गौरव मिळवून देणारी व्यक्ती इतकी नम्र आणि शांत कशी असू शकते, असं राहुल द्रविडला बघितल्यावर अनेकांना वाटलं.

शुभम कुलकर्णी

|

May 12, 2022 | 6:43 PM

मुंबई : आपण सामाजामध्ये गर्व, अहंकार असलेले अनेक लोक पाहतो. तर दुसरीकडे विनयशिल, सात्विक लोकांची देखील कमी नाहीये. भलेही पैशानं श्रीमंत असो पण सुधा मुर्तींसारख्या (sudha murthy) दिग्गजांकडे असलेला साधेपणा समाजात उठून दिसतो. असे लोक आता अभावानेच दिसून येतात. तोच साधेपणा भारताचा दिग्गज किकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्यामध्ये आहे. अनेकदा त्याच्या साधेपणासाठी तो ओळखला जातो. राहुल द्रविडचा असाच एका बुक स्टोअरमध्ये सर्वात मागे बसलेला फोटो व्हायरल झालाय. बंगळुरूमधील एका पुस्तकाच्या कार्यक्रमातून  एक फोटो समोर आलाय. फोटोमध्ये राहुल द्रविड मागच्या खुर्चीवर शांतपणे बसला आहे. सामन्य माणसाप्रमाणे सेलिब्रिटी (celebrity) असण्याचा थोडाही अभिमान त्याच्याजवळ साधा फिरकतही नाही. राहुल द्रविडचा हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. त्याच्या साधेपणाचं नेटिझन्सकडून कौतुक केलं जातंय.

द्रविड शांत बसला

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो बंगळुरूमधील एका बुक स्टोअरचा आहे. माजी क्रिकेटपटू जी. विश्वनाथ त्यांच्या पुस्तकावर बोलण्यासाठी आले होते. त्यावेळी याठिकाणी राहुल द्रविड देखील उपस्थित होता. राहुल द्रविड कार्यक्रमाच्या मागील बाजूस शांत बसला होता. भारतीय क्रिकेट संघाला अनेक गौरव मिळवून देणारी व्यक्ती इतकी नम्र आणि शांत कशी असू शकते, असं यावेळी अनेकांना वाटलं.

ट्विटर यूजर काशीने सांगतिलं की, राहुल द्रविड कार्यक्रमाला आला होता. तो रामचंद्र गुहा यांच्याशी बोलत होता. कार्यक्रमाला मी आणि माझ्यासोबत समीर होता. समीरने शांत बसलेला व्यक्ती द्रविड असल्याचं ओळखलं. द्रविड हा मागच्या खुर्चीवर शांत बसलेला होता. कार्यक्रमात जेव्हा जी. विश्वनाथ आत आले. त्यावेळी त्यांना द्रविड दिसला. राहुल त्यांच्याशी बोलायला पुढे आला. सर्वांना नमस्कार केला. यानंतर हा कार्यक्रम विश्वनाथ यांचा आहे.असं सर्वांना वाटलं. यानंतर द्रविड शांतपणे खाली बसला. हे बघता सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या.

राहुल द्रविडचा हा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. त्याच्या साधेपणाचं नेटिझन्सकडून कौतुक केलं जातंय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें