Cheteshwar Pujara : कौंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारानं रचला इतिहास, 118 वर्षात पहिल्यांदाच केला हा विक्रम, जाणून घ्या…

| Updated on: Jul 21, 2022 | 7:20 AM

पुजारा सध्या मिडलसेक्स विरुद्ध ससेक्स संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे. मंगळवारीच त्यानं आपलं शतक पूर्ण केलं. पण मैदानावर आल्यावर त्यानं आपला डाव 115 धावांनी वाढवण्यास सुरुवात केली.

Cheteshwar Pujara : कौंटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारानं रचला इतिहास, 118 वर्षात पहिल्यांदाच केला हा विक्रम, जाणून घ्या...
चेतेश्वर पुजारा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : क्रिकेट (Cricket) म्हटलं की विक्रम होणारच. विशेष म्हणजे क्रिकेट सामन्यात नवे विक्रम होतात, जुने विक्रम मोडलेही जातात. असाच एक विक्रम चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यानं केलाय. काऊंटी क्रिकेटमध्ये भारताचा (India) स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराची बॅट जोरदार धावत आहे. 19 जुलैपासून 38 व्या सामन्यात मिडलसेक्सविरुद्ध (Middlesex) शानदार फलंदाजी करताना त्यानं आणखी एक द्विशतक झळकावलं आहे. सध्या तो आपल्या संघासाठी वृत्त लिहिपर्यंत पहिल्या डावात 230 धावा करून मैदानात अडकला आहे. आपल्या जोरदार खेळीदरम्यान पुजारानं 399 चेंडूंचा सामना केला आणि 21 चौकार आणि तीन उत्कृष्ट षटकार ठोकले. या सामन्यादरम्यान त्यानं एक विशेष कामगिरीही केली. खरं तर कौंटी क्रिकेटच्या एका मोसमात तीन द्विशतके झळकावणारा तो ससेक्सचा 118 वर्षांतील पहिला खेळाडू ठरला आहे. म्हणजेच त्याच्याआधी इतर कोणत्याही खेळाडूनं हा पराक्रम केला नव्हता.

पुजाराची कमाल

पुजारा सध्या मिडलसेक्स विरुद्ध ससेक्स संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे. मंगळवारीच त्यानं आपलं शतक पूर्ण केलं. पण मैदानावर आल्यावर त्यानं आपला डाव 115 धावांनी वाढवण्यास सुरुवात केली. यानंतर मैदानात अनेक शानदार फटके खेळत त्यानं या मोसमातील तिसरं द्विशतक पूर्ण केलंय. सध्या तो आपल्या संघासाठी 230 धावा केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

हा व्हिडीओ पाहा

उल्लेखनीय आहे की मिडलसेक्सविरुद्ध सुरू असलेल्या 38व्या सामन्यात टॉम हेन्सच्या जागी पुजाराला कर्णधार बनवण्यात आलं आहे. भारतीय कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या पुजाराचं या मोसमातील सात काउंटी सामन्यांमध्ये पाचवं शतक आहे. ससेक्सच्या केवळ 99 धावांत दोन बळी घेतल्यानंतर, त्याने टॉम अॅस्लॉप (135) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 219 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला पुन्हा रुळावर आणले.

पुजाराने भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्येही अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. देशासाठी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये 96 सामने खेळताना त्याने 164 डावांमध्ये 43.8 च्या सरासरीने 6792 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18 शतके आणि 33 अर्धशतके आहेत. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजी कामगिरी नाबाद 206 आहे.