Asian Bodybuilding Competition : क्या बात है! आशियाई शरीरसौष्ठवात ‘सिंघम रिटर्न्स’, सुभाष पुजारींपाठोपाठ बलदेव कुमार यांना सुवर्ण

नवी मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी सुवर्ण जिंकले होते. तर चंदिगडचे 53 वर्षीय पोलीस इन्स्पेक्टर बलदेव कुमार यांनी 50 ते 60 वर्य वयोगटाच्या 80 किलोवरील वजनी गटात बाजी मारली आहे. 

Asian Bodybuilding Competition : क्या बात है! आशियाई शरीरसौष्ठवात 'सिंघम रिटर्न्स', सुभाष पुजारींपाठोपाठ बलदेव कुमार यांना सुवर्ण
Asian Bodybuilding CompetitionImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 7:04 AM

मालदीव :  क्या बात है, असं आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेकडे पाहून म्हटलं जातंय. या स्पर्धेत भारताची जोरदार पदकांची कमाई सुरू आहे. तर पुन्हा एकदा पोलिसांनीच बाजी मारली आहे. 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या (Asian Bodybuilding Competition) मास्टर्स गटात भारत (India) गोल्ड मास्टर ठरलाय. सुभाष पुजारींपाठोपाठ बलदेव कुमार यांनी 50 ते 60 वर्ष वयोगटात सोनेरी कामगिरी करीत भारताला आणखी दोन सुवर्ण पदके (Gold Medal) जिंकून दिली. विशेष म्हणजे पुजारींप्रमाणे बलदेव कुमारही पोलीस इन्सेक्टर आहेत. भारताने स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन सुवर्ण पदकांसह सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकत अकरा पदकांची कमाई केली. भारतासाठी स्पर्धेचा तिसरा दिवसही सोनेरी ठरला. शरीरसौष्ठवाच्या मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. काल झालेल्या तीन गटात भारताला एकही सुवर्ण जिंकता आलं नसलं तरी 55 किलो वजनी गटात आर. के. सुरेशने तर 65 किलो वजनी गटात बिचित्र नायकने रौप्य जिंकले. 60 किलो वजनी गटात एम. विघनेश कांस्य पदकाचा मानकरी ठरला. भारताच्या मास्टर्स खेळाडूंनी खऱ्या अर्थाने कमाल केली.

नवी मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर जोरात

नवी मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी सुवर्ण जिंकले होते. तर चंदिगडचे 53 वर्षीय पोलीस इन्स्पेक्टर बलदेव कुमार यांनी 50 ते 60 वर्य वयोगटाच्या 80 किलोवरील वजनी गटात तरुणांनाही लाजवेल असं शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करीत बाजी मारली. या गटात सत्यनारायण राजू दुसरे आले. त्यानंतर झालेल्या 60 वर्षांवरील वजनी गटात 66 वर्षीय तरुण कुमार चॅटर्जी यांनी सोनेरी यश संपादले. या गटात 73 वर्षीय व्ही. रथिनम यांची पीळदार शरीरयष्टी पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. भारताने मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या पाचही गटांत पदके जिंकली. विशेष म्हणजे तीन सुवर्णपदकांसह एकूण आठ पदकांची कमाई भारताच्या मास्टर्स शरीरसौष्ठवपटूंनी केली.

हायलाईट्स

  1. भारताने स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन सुवर्ण पदके जिंकली
  2. तिसऱ्या दिवशी भारतानं सहा रौप्य आणि तीन कांस्यपदकेही जिंकली
  3. हे सुद्धा वाचा
  4. भारताची आतापर्यंत अकरा पदकांची कमाई केली
  5. 55 किलो वजनी गटात आर. के. सुरेशने तर 65 किलो वजनी गटात बिचित्र नायकने रौप्य जिंकले
  6. 60 किलो वजनी गटात एम. विघनेश कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
  7. भारताच्या मास्टर्स खेळाडूंनी खऱ्या अर्थाने कमाल केली

मलेशियन अनचाहची चर्चा

शरीरसौष्ठव स्पर्धेच्या 65 किलो वजनी गटात तरुण खेळाडूंवर मात करीत मलेशियाच्या बुडा अनक अनचाहने सर्वांचीच मने जिंकली. या गटात भारताच्या बिचित्र नायकचे सुवर्ण हुकले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

या स्पर्धेपाठोपाठ झालेल्या 50 ते 60 किलो वजनी गटाच्या मास्टर्स स्पर्धेतही अनचाह उतरला आणि त्याने सहजपण सुवर्ण जिंकले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.