AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जसप्रीत बुमराहला आराम महाग पडला, फक्त एका मॅचने गेम झाला, हार्दिक पंड्याला मिळाली खुशखबरी

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आराम चांगलाच महाग पडला. इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या वनडेत पाठिच्या दुखापतीमुळे बुमराह खेळला नाही. त्याला विश्रांती देण्यात आली होती.

जसप्रीत बुमराहला आराम महाग पडला, फक्त एका मॅचने गेम झाला, हार्दिक पंड्याला मिळाली खुशखबरी
jasprit-bumrahImage Credit source: AP
| Updated on: Jul 20, 2022 | 7:21 PM
Share

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आराम चांगलाच महाग पडला. इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या वनडेत पाठिच्या दुखापतीमुळे बुमराह खेळला नाही. त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्याच्याजागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली. बुमराहला तिसऱ्या सामन्यातील विश्रांतीचा फटका गोलंदाजांच्या वनडे रँकिंग मध्ये बसला आहे. आयसीसीच्या ताजा वनडे रँकिंग (ICC Odi Ranking) मध्ये गोलंदाजांच्या यादीत बुमराहच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. ऑलराऊंडर्सच्या यादीत हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) क्रमवारीत 13 स्थानांची सुधारणा झाली आहे. तो 8 व्या नंबरवर पोहोचला आहे. भारताने वनडे सीरीज मध्ये इंग्लंडला 2-1 ने हरवलं.

बुमराह शेवटचा सामना खेळला नाही

बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे तिसऱ्या वनडेत खेळला नव्हता. ज्यामुळे त्याला अव्वल स्थान गमवावं लागलं. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट 704 रेटिंग पॉइंटसह टॉपवर आहे. बुमराह त्याच्यापेक्षा एक पॉइंटने मागे आहे. इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने सरस खेळ दाखवला. ओव्हलवरील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने 19 धावात 6 विकेट काढून सर्वोत्तम गोलंदाजी केली. करीयरमधलं त्याच हे सर्वोत्तम प्रदर्शन होतं. पुढच्या सामन्यात त्याने दोन विकेट काढल्या. युजवेंद्र चहलला रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला. भारतीय स्टार स्पिनरच्या क्रमवारीत 4 स्थानांची सुधारणा झाली. तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला. इंग्लंड विरुद्ध 6 विकेट 100 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याच्या फलंदाजीच्या रँकिंगमध्ये 8 स्थानांची सुधारणा झालीय. तो 42 व्या स्थानावर आहे.

ऋषभ पंतची मोठी उडी

शेवटच्या वनडे मध्ये नाबाद 125 धावा फटकावणाऱ्या ऋषभच्या क्रमवारीत 25 स्थानाची सुधारणा झाली आहे. तो 52 व्या स्थानावर पोहोचलाय. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम फलंदाजांमध्ये शीर्षस्थानी आहे. विराट कोहली चौथ्या आणि रोहित शर्मा पाचव्या नंबरवर. ऑलराऊंडर्सच्या यादीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या क्रमवारीत चार स्थानांची घसरण झालीय. तो टॉप 10 मधून बाहेर गेलाय.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.