AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुबमन गिल 450 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात फसला? सीआयडीकडून चार क्रिकेटपटूंना समन्स

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज शुबमन गिल एका प्रकरणात पुरता फसल्याचं दिसत आहे. गुजरातमधील एका कंपनीत केलेली गुंतवणूक अंगलट आल्याचं दिसत आहे. इतकंच काय तर गुजरात टायटन्सच्या इतर खेळाडूंनीही गुंतवणूक केली होती.

शुबमन गिल 450 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात फसला? सीआयडीकडून चार क्रिकेटपटूंना समन्स
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 02, 2025 | 4:13 PM
Share

कमी वेळात दाम दुप्पट.. कमी पैशात जास्त व्याजदर वगैरे या योजना खऱ्या अर्थाने फसव्या असतात. पण असं असूनही शिकले सवरलेले लोकं यात फसतात. पैसे दुप्पट करण्याच्या नादात आहे ते गमवून बसतात. अशी अनेक उदाहरणं भुतकाळात घडली आहेत. पण तरीही या मायाजाळात अनेकांची फसवणूक होत असते. असाच एक फसवणुकीचा प्रकार गुजरातमधून समोर आला आहे. या प्रकरणी गुजरात सीआयडी चार क्रिकेटपटूंना समन्स पाठवणार असल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, शुबमन गिल, राहुल तेवतिया, मोहित शर्मा आणि साई सुदर्शन 450 कोटींच्या चिट फंड स्कॅममध्ये अडकल्याचं दिसत आहे. 450 कोटींचा स्कॅम गुजरातच्या बीझेड ग्रुपशी निगडीत आहे. बीझेड ग्रुपने गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा जास्त व्याज दर देण्याचा आश्वासन दिलं होतं. पण जेव्हा त्यांची फसवणूक झाली तेव्हा त्यांनी पोलिसात धाव घेतली.

अहमदाबाद मिररच्या रिपोर्टनुसार, गुजरात टायटन्सच्या या खेळाडूंनी पॉन्झी स्किममध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. यात गिलने 1.95 कोटींची गुंतवणूक केल्याचं समोर येत आहे. तर इतर खेळाडूंनी कमी अधिक प्रमाणात यात गुंतवणूक केल्याचंही सांगितलं जात आहे. गुजरात सीआयडीने या प्रकरणात एक अटक केली आहे. गेल्या महिन्यात त्यांनी बीझेड ग्रुप घोटाळ्याशी संबंधित भूपेंद्रसिंग झाला याला मेहसाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. भूपेंद्र सिंगने क्रिकेटपटूंची नावं घेतल्याने हे प्रकरण आणखी तापलं आले. त्याने पोलिसांना सांगितले की, आजपर्यंत त्याने गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनाही इंटरेस्ट दिला नाही. इतकंच क्रिकेटपटूंनी केलेली गुंतवणूक परत करण्यात अपयशी ठरल्याचं सांगितलं आहे. त्याच्या जबाबानंतर क्रिकेटपटूंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

गुजरात सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, सध्या सुरू असलेल्या तपासात खेळाडूंचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल आणि प्रकरण जसं पुढे जाईल तसं पुढील घडामोडी अपेक्षित आहेत. शुबमन गिल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. त्यामुळे मायदेशी परतल्यानंतर त्याला समन्स पाठवला जाईल, असं सीआयडी अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

भूपेंद्रसिंह झाला हा साबरकांठा येथील हिम्मतनगर शहरातील रहिवासी आहे. त्याने 2020 ते 2024 या कालावधीत राज्यभरात स्थापन केलेल्या 17 कार्यालयांमधून 11000 गुंतवणूकदारांकडून 450 कोटी रुपये गोळा केले असल्याची पोलिसांची माहिती आहे. गिल आणि इतर तीन क्रिकेटपटू या 11000 गुंतवणूकदारांमध्ये असल्याचे सांगितलं जात आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.