CWG 2022: देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्यासाठी दोन भाऊ उतरणार मैदानात
Commonwealth Games 2022 स्पर्धा आठवड्याभरावर आली आहे. बर्मिंघम मध्ये 28 जुलैपासून स्पर्धा सुरु होईल. पदक विजेती कामगिरी करण्यासाठी खेळाडूंमध्ये स्पर्धा सुरु होईल.

Commonwealth Games 2022 स्पर्धा आठवड्याभरावर आली आहे. बर्मिंघम मध्ये 28 जुलैपासून स्पर्धा सुरु होईल. पदक विजेती कामगिरी करण्यासाठी खेळाडूंमध्ये स्पर्धा सुरु होईल. यावेळी दोन भाऊ आपल्या लहानपणाचं स्वप्न साकार करण्यासाठी उतरतील. बर्मिंघम मध्ये गोल्ड जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. गोल्ड पेक्षा कमी चालणार नाही. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सहभागी होणारे हे दोन भाऊ भारतीय पथकाचे सदस्य नाहीत. ऑस्ट्रेलियातून आले आहेत. तिथल्या 12 सदस्यीय ज्यूडो टीम मध्ये त्यांची निवड झाली आहे.
2014 ग्लस्गो गेम्स नंतर कॉमनवेल्थ मध्ये जूडोचा समावेश होतोय. नाथन कॅट्ज आणि जोश कॅट्ज अशी या दोन भावांची नाव आहेत. बर्मिंघम मध्ये ऑस्ट्रेलियाला या दोघांकडून गोल्ड मेडलची अपेक्षा आहे. जूडो मध्ये कॅट्ज फॅमिलीचा खूप चांगला इतिहास आहे.
कॅट्ज ब्रदर्सने बर्मिंघम मध्ये जूडो मध्ये गोल्ड जिंकण्याची जोरदार तयारी केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मेलबर्न मध्ये जोरदार मेहनत केलीय. देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं त्यांचं लहानपणापासूनच स्वप्न आहे.
