VIDEO : भारतीय वंशाच्या जसकरणची धमाकेदार फलंदाजी, 6 चेंडूत 6 षटकार ठोकत रचला इतिहास

युवराज सिंगनंतर आणखी एका पंजाबी क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय सामन्यात सहा चेंडूत सहा षटकार ठोकले आहेत. पण हा खेळाडू भारताकडून नाही तर अमेरिका संघाकडून क्रिकेट खेळतो आहे.

VIDEO : भारतीय वंशाच्या जसकरणची धमाकेदार फलंदाजी, 6 चेंडूत 6 षटकार ठोकत रचला इतिहास
जसकिरण मल्होत्रा
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 4:44 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना षटकाराला सर्वाधिक महत्त्व असतं. एक षटकारही सामना फिरवू शकतो. अशावेळी एका ओव्हरणध्ये सहा षटकार म्हणजे अगदी शेवटच. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 सालच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड्स  संघाविरुद्ध सहा षटकार ठोकले होते. त्यानंतर भारताचा सिक्सर किंग युवराजने त्याच वर्षी टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुवर्ट ब्रॉडला सहा षटकार ठोकले होते. आता आणखी एका भारतीयाने ही कामगिरी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सहा षटकार ठोकले आहेत. पण हा भारतीय भारतासाठी नाही तर अमेरिका संघासाठी खेळत असून त्याचं नाव आहे जसकरण मल्होत्रा (Jaskaran Malhotra).

भारतातील चंदीगड शहरात जन्मलेला 32 वर्षीय जसकरणने अमेरिका संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतो. त्याने गुरुवारी 9 (सप्टेंबर) पापुआ न्यू गिनी (PNG) संघाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकत कारनामा केला. यासोबतच त्याने आपलं नाव गिब्ज, युवराज या दिग्गजांच्या यादीत सामिल केलं आहे. एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी करणारा तो गिब्जनंतर पहिलाच खेळाडू ठरला आहे. सामन्यात जसकरणने 124 चेंडूत 173 धावा केल्या. ज्यात 16 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे अमेरिकेचा एकही खेळाडू 22 हून अधिक धावा करु शकला नसताना जसकरणने ही अप्रतिम कामगिरी केली. आयसीसीने जसकरणचा हा व्हिडीओ पोस्ट करत त्याच अभिनंदन केलं आहे.

अमेरिका विजयी, मालिकेतही आघाडी

सामन्यात अमेरिका संघाची प्रथम फलंदाजी होती. यावेळी अमेरिकेकडून जसकरणने पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे सर्वत्र त्याच्या नावाची चर्चा आहे. सामन्यात जसकरणच्या 173 धावांच्या जोरावर अमेरिकेने 9 विकेटच्या बदल्यात 271 धावा केल्या. ज्यानंतर पीएनजीचा संघ मात्र  134 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे अमेरिकेने सामना जिंकत मालिकेतही  2-0 ची आघाडी घेतली आहे.

इतर बातम्या

India vs England 5th Test : पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचा घाला, दोन्ही बोर्डांच्या सहमतीने सामना रद्द!

वयाच्या 19 व्या वर्षी विश्वचषक जिंकला, 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकलं, पण भारतीय संघात राहिला मागे, टी-20 संघातही नाव नाही

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

(Cricketer Jaskaran Malhotra created history as he hit six sixes in an over against PNG for America)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.