विराट कोहलीच्या नवीन टॅटूचा अर्थ तरी काय? सोशल मीडियात जोरदार चर्चा, कुणासोबत खास कनेक्शन? वाढला सस्पेन्स
Virat Kohli new tattoo: धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली याने नवीन टॅटू गोंदवला आहे. पाण्याच्या लाटांमधून त्याला काय सुचावायचे आहे. त्याचे कुणाशी खास कनेक्शन आहे, याची चर्चा रंगली आहे. का वाढला टॅटूचा सस्पेन्स?

भारतीय क्रिकेटमधील धमाकेदार खेळाडू विराट कोहली हा सातत्याने चर्चेत असतो. प्रेमानंद महाराज यांच्या दरबारात हजेरी लावणं असो वा प्रतिस्पर्ध्याला टशन देणे असो, त्याचा वेगळा अवतार नेहमी समोर येतो. त्याच्या नवीन लूकचही मध्यंतरी जोरदार चर्चा होती. आता धावपट्टीवरून त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चेची सुई सरकली आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. किंग कोहलीने एक अनाकलनीय, गुढ असे टॅटू गोंदवले आहे. या डिझाईनमध्ये पाण्याचा थेंब पडताना आणि त्यातून गोलाकार लाटा तयार होताना दिसत आहे. विराटने हा टॅटू त्याच्या डाव्या हातावर गोंदवला आहे. या टॅटूचा अर्थ लावताना नेटकरी मात्र बुचकाळ्यात पडले आहे. किंग कोहलीच्या मनात नेमकं काय आहे? त्याला या टॅटूमधून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
गुढ टॅटने वेधले लक्ष
विराट कोहलीच्या डाव्या हातावर वरच्या भागापर्यंत हा टॅटू गोंदवला गेला आहे. त्याचा एक खास पॅटर्न समोर आला आहे. या डिझाईनमध्ये पाण्याचा एक थेंब खाली पडताना दिसतो आणि त्यातून जललहरी, पाण्याच्या लाटा उमटताना दिसतात. हा टॅटू हटके वाटत आहे. त्यातून विराटच्या व्यक्तिमत्वाची झलक दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कोहलीने हा टॅटू का गोंदवला आणि त्यामागील नेमका अर्थ काय? हे अद्याप सार्वजनिक केले नाही. त्यामुळे जो तो त्याच्या परीने टॅटूचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहे.
पाच सेशन, पण टॅटू पूर्ण नाही
विराट कोहलीचा हा टॅटू तयार करण्यासाठी पाच सेशन झाली आहेत. पण अद्यापही टॅटूचे काम पूर्ण झालेले नाही. टॅटू आर्टिस्ट एलन एफ. गोईस याने या टॅटूचा आणि विराटचा फोटो त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. त्यानुसार टॅटू काढण्यासाठी पाच सेशन पूर्ण झाली आहेत. पण डिझाईनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे या टॅटूचा सस्पेन्स वाढला आहे. वेगवेगळ्या शैली आणि पद्धतीचा वापर करून ही कलाकृती पूर्ण करण्यात येत असल्याचे टॅटू आर्टिस्टचे म्हणणे आहे.
या टॅटूमध्ये पाण्याचा एक थेंब पडताना दिसत आहे. पण त्याचा परिणाम अनेक ठिकाणी होत आहे. त्यातून लहर उत्पन्न होताना, पाण्यावरील तवंग, लाटा, लहरी उमटतानाचे दिसत आहे. पण अद्याप टॅटूचे काम अपूर्ण असल्याने त्याचा अर्थ लावण्यात, निष्कर्ष काढण्याची घाई योग्य होणार नसल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
हा टॅटू जुन्या टॅटूशी जोडण्यात येणार आहे. त्यातून एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचे अनेक व्यक्तित्व, आध्यात्मिक विश्वास वा जीवनातील विविध घडामोडींशी जोडण्याचा प्रयत्न या डिझाईनमधून करण्यात येणार असल्याचे समजते. पण सध्या या टॅटूने सस्पेन्स वाढवला आहे.