Virat Kohli Linkedin : विराट कोहलीची नवी सुरुवात? 37 व्या वर्षी…चाहतेही झाले चकित, त्या निर्णयाची होतेय चर्चा!
LinkedIn वर असलेले हे खाते विराट कोहलीचेच असल्याचा दावा केला जातोय. म्हणूनच अवघ्या काही तासात या खात्याला तब्बल 52 हजार लोकांनी फॉलो केलंय. अजूनही बरेच लोक या खात्याला फॉलो करत आहेत.

Virat Kohli LinkedIn Account : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली नेहमीच चर्चेत असतो. यावेळी मात्र सध्या विराट वेगळ्या कारणामुळे चर्चेचं कारण ठरलाय. तो क्रिकेटमधील किंग तर आहेच परंतु गुंतवणुकीच्या बाबतीतही विराटने मोठी कमाल केलेली आहे. त्याने स्वत:चा ब्रँडही सुरू केलेला आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. विराटच्या एका फेसबूक, इन्स्टाग्राम पोस्टवर लाखोंनी लाईक येतात. दरम्यान, आता विराट कोहलीने एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्याच्या या कथित निर्णयाची सगळीकडेच चर्चा होतेय.
विराट कोहलीची नव्या क्षेत्रात एन्ट्री?
विराट कोहलीने LinkedIn वर आपलं खातं खोलल्याचं बोललं जातंय. विराटच्या या कथित खात्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत साधारण 52 हजार लोकांनी त्याला LinkedIn वर फॉलोही केलंय. एकीकडे व्हायरल होत असलेले LinkedIn खाते हे विराट कोहलीचेच आहे, असा दावा केला जातोय. तर दुसरीकडे या खात्याच्या सत्यतेबाबत अनेक प्रश्न विचारले जातायत. विराट कोहलीनेही आतापर्यंत या खात्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
विराट कोहलीने कुठे कुठे गुंतवणूक केली?
विराट कोहलीने LinkedIn वर आपले प्रोफाईल क्रिएट केल्याचे बोलले जातेय. या खात्यावर मी एक क्रिकेटर आहे, अशी माहिती देण्यात आलीय. तसेच विराट कोहलीच्या व्यवसायाबद्दलही या खात्याच्या बायोमध्ये सांगण्यात आलंय. व्हायरल होत असलेल्या प्रोफाईलनुसार कोहलीने 2025 साली एजिलिटासमध्ये गुंतवणूक केलेली आहे. विराट 2026 सालापासून one8world या ब्रँडचा सहसंस्थापकही असल्याचे या प्रोफाईलमध्ये सांगण्यात आलेय.
Hey @grok, can you tell me for what purpose Virat Kohli created a LinkedIn account? What was the need for it, after all? https://t.co/XsgHk8CQtU
— Googly (@goo__gly9) October 13, 2026
LinkedIn खात्याच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह
दरम्यान, LinkedIn वर असलेले हे खाते विराट कोहलीचेच असल्याचा दावा केला जातोय. म्हणूनच अवघ्या काही तासात या खात्याला तब्बल 52 हजार लोकांनी फॉलो केलंय. अजूनही बरेच लोक या खात्याला फॉलो करत आहेत. परंतु LinkedIn वर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या नावापुढे व्हेरिफाईड बॅज नाही. तसेच LinkedIn प्रिमियमबाबतही या खात्यावर काहीच माहिती नाही. विराट कोहली किंवा त्याच्या टीमकडूनही याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे खाते विराटचेच आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. परंतु सध्या सोशल मीडियावर LinkedIn वरील त्या खात्याची मात्र सगळीडेच चर्चा होतेय.