AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni IPL 2023 : एमएस धोनीच्या कॅप्टनशिपवर रवींद्र जाडेजाचा जळफळाट ? एका Like वरुन नवीन वाद

MS Dhoni IPL 2023 : आता रवींद्र जाडेजाने नवीन काय केलं?. रवींद्र जाडेजाने सोशल मीडियावर केलेल्या या कृतीमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. त्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

MS Dhoni IPL 2023 : एमएस धोनीच्या कॅप्टनशिपवर रवींद्र जाडेजाचा जळफळाट ? एका Like वरुन नवीन वाद
ms dhoni-ravindra jadejaImage Credit source: PTI
| Updated on: May 12, 2023 | 9:57 AM
Share

चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा टॉप फॉर्ममध्ये आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा जाडेजा चेन्नई सुपर किंग्ससाठी बॅटिंग आणि बॉलिंग दोघांमध्ये शानदार कामगिरी करतोय. रवींद्र जाडेजाने अलीकडेच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध शानदार ऑलराऊंडर प्रदर्शन केलं होतं. ज्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. त्याशिवाय जाडेजा त्याच्या सोशल मीडिया reaction मुळे सुद्धा चर्चेत आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात CSK ने दिल्ली कॅपिटल्सवर 27 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर जाडेजाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. त्याला बॅटिंगबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्याने, “जर मी बॅटिंगसाठी वर आलो, तर लोक माही, माही म्हणून घोषणा देतील. मी लवकर आऊट व्हावं, म्हणून प्रार्थना करतील” एवढच बोलून जाडेजा हसायला लागला. ़

जाडेजाच्या एका लाइक नंतर हंगामा

जाडेजाच्या या वक्तव्या सोशल मीडियावर एका युजरने पोस्ट केलीय. “जाडेजा हे खूप हसून बोलतोय. पण आतून त्याला खूप त्रास होतोय. हे कुठल्या धक्क्यापेक्षा कमी नाही, असं मला वाटतं. जरा, विचार करा, तुमच्या टीमचे सपोटर तुमच्या पाठिशी नाहीयत. त्यांना तुम्हाला आऊट होताना पहायच आहे. तीन मॅन ऑफ द मॅच जिंकूनही तुमच्यावर टीका होते” महत्वाच म्हणजे जाडेजाने या टि्वटला लाइक केलय. त्यानंतर सोशल मीडियावर हंगमा सुरु आहे.

सीएसकेने कॅप्टन बनवलेलं

आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जाडेजाला सीएसकेने कॅप्टन म्हणून नियुक्त केलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सीजनच्या मध्यमावर जाडेजाला टीमच्या कॅप्टनशिपवरुन हटवून पुन्हा धोनीकडे नेतृत्व दिलं. पॉइंट्स टेबलमध्ये सीएसके तळाला होती. त्यानंतर जाडेजा सीएसकेपासून वेगळा होणार, आयपीएल 2023 मध्ये तो सीएसकेकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, पडद्यामागे बरच काही घडलं. रवींद्र जाडेजा अजूनही सीएसकेकडून खेळतोय.

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल