AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs CSK 2023 : दांड्या कशा गुल झाल्या? स्टॉयनिसला समजलच नाही, जाडेजाचा IPL मधील क्लासिक टर्न VIDEO

LSG vs CSK 2023 : यंदाच्या आयपीएलमधील रवींद्र जाडेजाचा हा एक अप्रतिम चेंडू आहे. एकदा VIDEO बघा. या चेंडूनंतर स्टॉयनिस पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जाडेजाचा हा आयपीएलमधील सर्वोत्तम चेंडू होता, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही.

LSG vs CSK 2023 : दांड्या कशा गुल झाल्या? स्टॉयनिसला समजलच नाही, जाडेजाचा IPL मधील क्लासिक टर्न VIDEO
रवींद्र जडेजाने 300 पैकी 164 सामने चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. एका संघासाठी 150 हून अधिक सामने खेळणारा तिसरा खेळाडू आहे. धोनी 235 आणि सुरेश रैना चेन्नईकडून 200 सामने खेळला आहे. जडेजाने भारतासाठी 64 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.
| Updated on: May 03, 2023 | 6:56 PM
Share

लखनौ : रवींद्र जाडेजाला का रॉकस्टार म्हटलं जातं, त्याचा पुरावा त्याने लखनौमध्ये दिला. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या ऑलराऊंडरने कमाल केली. रवींद्र जाडेजाने एक चेंडू टाकून ही कमाल दाखवली. चेंडू इतका खतरनाक होता, की जगातील कुठलाही फलंदाज त्या समोर सहजासहजी टिकू शकला नसता. मार्कस स्टॉयनिसने जाडेजाच्या या चेंडूचा सामना केला.

या चेंडूनंतर स्टॉयनिस पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जाडेजाचा हा आयपीएलमधील सर्वोत्तम चेंडू होता, असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही.

बोल्ड झालोय, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता

लखनौच्या इनिंगमधील 7 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजाने ही ओव्हर टाकली. जाडेजाचा हा चेंडू लेग स्टम्पवर पडला. पण बॅट्समनचा ऑफ स्टम्प उडाला. जाडेजाचा हा चेंडू खूपच वळला. त्यामुळे स्टॉयनिसचा ऑफ स्टम्प उडाला. विकेट गेल्यानंतर स्टॉयनिसच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसले. आपण बोल्ड झालोय, यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

बॅटने फेल, चेंडूने हिट

रवींद्र जाडेजाची बॅट विशेष चाललेली नाही. तो चेंडूने धुमाकूळ घालतोय. जाडेजाने 9 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्यात. त्याचा इकॉनमी 7.50 प्रति ओव्हर आहे. बॅटने त्याचा परफॉर्मन्स सरासरीपेक्षा कमी आहे. 7 इनिंग्समध्ये 18.40 च्या सरासरीने 92 धावा केल्या आहेत. भले बॅटने नसेल, चेंडूने जाडेजा आपला प्रभाव दाखवून देतोय. लखनौमध्ये चेन्नईच्या स्पिनर्सचा जलवा

लखनौच्या पीचवर चेन्नईच्या स्पिनर्सनी कमाल केली. मोइन अलीने 4 ओव्हरमध्ये 13 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या. माहीश तीक्ष्णाने 2 ओव्हरमध्ये 11 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. रवींद्र जाडेजाने किफायती गोलंदाजी केली. त्याने 3 ओव्हर्समध्ये 11 रन्स देऊन एक विकेट काढला. लखनौच्या टीमने 9.4 ओव्हरमध्ये 44 धावात 5 विकेट गमावल्या होत्या. चांगली बॅटिंग लाइनअप असून सुद्धा लखनौची टीम आपल्या घरी स्पिन फ्रेंडली विकेट बनवतेय. या रणनितीमध्ये त्यांचे मोठे हिटर्स काइल मेयर्स, स्टॉयनिस आणि पूरन चालत नाहीयत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.