AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs GT IPL 2023 Qualifier 1 Result : आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला

CSK vs GT IPL 2023 Qualifier 1 Result : चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीममध्ये आयपीएल 2023 चा पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही मॅच झाली.

CSK vs GT IPL 2023 Qualifier 1 Result : आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला
| Updated on: May 23, 2023 | 11:29 PM
Share

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीम्समध्ये IPL 2023 क्वालिफायरचा पहिला सामना झाला. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम पहिल्या आणि चेन्नई दुसऱ्या स्थानावर होती. त्यामुळे क्वालिफायरचा पहिला सामना या दोन टीम्समध्ये झाला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही मॅच झाली. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन टीम्समध्ये तीन सामने झाले आहेत. तिन्हीवेळा गुजरातने बाजी मारली आहे.

चेन्नईची टीम आपल्या घरच्या मैदानावर खेळत होती. त्यामुळे त्यांना फायदा मिळणं स्वाभाविक होतं. गुजरातचा वेगवान गोलंदाज दर्शन नलकांडेने दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडला आऊट केलं होतं. शुभमन गिलने कॅच घेतली होती. पण तो नो बॉल ठरला. त्यानंतर ऋतुराजने मिळालेल्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला.

चेन्नईकडून दोघे खेळले

त्याने चेन्नईकडून सर्वाधिक 44 चेंडूत 60 धावा केल्या. यात 7 फोर, 1 सिक्स होता. त्याखालोखाल डेवॉन कॉनवे 34 चेंडूत 40 आणि रवींद्र जाडेजाने 16 चेंडूत 22 धावा केल्या. अन्य फलंदाज फारसे यशस्वी ठरले नाहीत. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 172 धावा केल्या.

गुजरातची खराब सुरुवात

गुजरातकडून मोहित शर्मा, मोहम्मद शमीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतले. चेन्नईच्या या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. गुजरात टायटन्सला वृद्धीमान साहाच्या रुपाने 22 धावांवर पहिला झटका बसला. दीपक चाहरने पाथिराणाकरवी कॅचआऊट केलं. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पांड्या 8 रन्सवर आऊट झाला. तीक्ष्णाने त्याला जाडेजाकरवी कॅचआऊट केलं. पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सच्या 2 बाद 41 धावा झाल्या होत्या. फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोणता?

त्यानंतर धोनीने रवींद्र जाडेजा आणि माहीश तीक्ष्णा या फिरकी गोलंदाजांना आणलं. दोघांनी अचूक टप्प्यावर बॉलिंग करुन शुभमन गिलला जखडून टाकलं. या दरम्यान दासुन शनाका, डेविड मिलर, राहुल तेवतिया सारखे भरवशाचे फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे गुजरातची टीम बॅकफूटवर गेली. अखेरीस चेन्नईने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला व CSK आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव 157 धावांवर आटोपला. रवींद्र जाडेजाने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 2 विकेट घेतले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.