AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाड याचा खणखणीत सिक्स, बॉल थेट कारवर आदळला

ऋतुराज गायकवाड याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. यात त्याने एकूण 4 सिक्स मारले. यापैकी मारलेला एक सिक्स हा थेट कारवर जाऊन आदळला.

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाड याचा खणखणीत सिक्स, बॉल थेट कारवर आदळला
| Updated on: Apr 03, 2023 | 9:59 PM
Share

तामिळनाडू | आयपीएल 16 व्या मोसमातील 6 वा सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवणयात येत आहे. या सामन्यात चेन्नईने टॉस गमावून बॅटिंग करताना शानदार सुरुवात केली. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीने चेन्नईला शानदार सुरुवात करुन दिली. या ओपनिंग जोडीने फक्त 9.1 ओव्हरमध्ये 110 रन्सची पार्टनरशीप केली. ऋतुराजने या दरम्यान या मोसमातील सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. ऋतुराजने अवघ्या 25 बॉलमध्ये ही अर्धशतकी खेळी केली. ऋतुराजने या अर्धशतकी खेळीत 4 सिक्स मारले. ऋतुराजने यात मारलेला एक सिक्स हा थेट मैदानात असलेल्या कारवर जाऊन आदळला. ऋतुराजने मारलेल्या या सिक्सचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मैदानाबाहेर असलेली ही कार आयपीएल जिंकणाऱ्या टीममधील खेळाडूला मिळणार आहे. प्रत्येक सामन्यात ही कार ठेवण्यात येते. ऋतुराजने मारलेला फटका हा थेट कारच्या दरवाजाच्या आसपासच्या भागात लागला. यात कारचं फार नुकसान झालं नाही. मात्र कारचा पत्र्याचं थोड्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

ऋतुराजकडून लखनऊ विरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ऋतुराज 7 धावा जोडल्यानंतर 57 रन्स करुन ऋतुराज आऊट झाला. ऋतुराजने 31 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 3 चोकारांच्या मदतीने एकूण 57 रन्स केल्या.

ऋतुराजचा जोरदार सिक्स कारवर आदळला

दरम्यान चेन्नईने लखनऊला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. तर डेव्हॉन कॉनवे याने 47 रन्संचं योगदान दिलं. ऋतुराज आणि डेव्हॉन या दोघांनी केलेल्या 110 धावांच्या सलामी भागीदारीमुळे चेन्नईला 200 पार मजल मारता आली. तर लखनऊकडून रवी बिश्नोई आणि मार्क वूड या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर आवेश खान याने 1 विकेट घेतली.

चेन्नई सुपरकिंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन) डेवन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कर्णधार), कायल मायर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोयनिस, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्क वूड, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि आवेश खान.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.