CSK vs MI: पलटणमध्ये 3 बदल फिक्स! यलो आर्मी विरुद्ध कुणाचा पत्ता कट?

Mumbai Indians Playing 11 Against Chennai Super Kings : चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 44 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ससमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. मुंबई या सामन्यासाठी कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग ईलेव्हन.

CSK vs MI: पलटणमध्ये 3 बदल फिक्स! यलो आर्मी विरुद्ध कुणाचा पत्ता कट?
Mumbai Indians Hardik Pandya IPL 2026
Image Credit source: Bcci
| Updated on: May 02, 2026 | 6:50 PM

मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. मात्र मुंबईला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात चॅम्पियन टीमप्रमाणे काहीच करता आलेलं नाही. मुंबईने या मोसामत चाहत्यांनी घोर निराशा केली आहे. मुंबईने 2012 नंतर यंदा पहिल्यांदाच मोसमातील आपला पहिल सामना जिंकला. त्यामुळे पलटण यंदा काही तरी वेगळं करेल, असा विश्वास आणि आशा चाहत्यांना होती. मात्र पलटणच्या खेळाडूंनी निराशा केली. मुंबईला आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबईसाठी प्लेऑफचं समीकरण अत्यंत अवघड झालंय.

मुंबईला प्लेऑफच्या हिशोबाने इथून एकही सामना गमावणं महागात पडणारं ठरु शकतं. त्यामुळे मुंबई उर्वरित सामन्यांत काय रणनितीने खेळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई आपल्या मोहिमेतील नववा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 2 मे रोजी चेपॉक स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी चेन्नई विरूद्धच्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार असल्याचं निश्चित म्हटलं जात आहे. मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असू शकते हे आपण जाणून घेऊयात.

ट्रेंट बोल्ट

ट्रेंट बोल्ट अनुभवी गोलंदाज आहे. मात्र ट्रेंटला अद्याप काही खास करता आलेलं नाही. ट्रेंटने निराशा केली आहे. त्यामुळे कॅप्टन हार्दिक ट्रेंटच्या जागी कॉर्बिन बॉश याला संधी देऊ शकतो. कॉर्बिनला संधी दिल्यास मुंबईकडे फलंदाजीचे पर्याय वाढतील.

शार्दूल ठाकुरला हटवणार?

शार्दूल ठाकुर बॉलिंगसह बॅटिंग करण्यात माहित आहे. मात्र यंदा शार्दूलला बॉलिंगने काही खास करता आलेलं नाही. शार्दूलला गेल्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी मिळाली. मात्र हार्दिकने शार्दूलला एकही ओव्हर बॉलिंग दिली नाही. त्यामुळे आता शार्दूलच्या जागी दीपक चाहर याचा समावेश केला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अल्लाह गजनफर

अल्लाह गजनफर याने मुंबईसाठी आतापर्यंत चांगली कामगिरी केलीय. मिचेल सँटनर याच्या जागी केशव महाराज याला संधी मिळाली आहे. त्यामुळे केशवला संधी देण्यासाठी अल्लाहला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चेन्नई विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, केशव महाराज, जसप्रीत बुमराह आणि अश्विनी कुमार.

Follow Us