AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : गेलची बरोबरी, संजूला पछाडलं, केएलचं रेकॉर्ड ब्रेक शतक, काय केलं?

KL Rahul Record : दिल्ली कॅपिट्ल्सचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने अरुण जेटली स्टेडियममध्ये ऐतिहासिक खेळी केली. केएलने या खेळीसह संजू सॅमसन याला मागे टाकलं.

IPL 2026 : गेलची बरोबरी, संजूला पछाडलं, केएलचं रेकॉर्ड ब्रेक शतक, काय केलं?
KL Rahul Century DC vs PBKSImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 25, 2026 | 6:20 PM
Share

संजू सॅमसन याला गेली अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नव्हती. संजूला अपवाद वगळता फॉर्म आणि धावांसाठी झगडावं लागत होतं. मात्र संजूसाठी मायदेशात झालेला टी 20I वर्ल्ड कप गेमचेंजर ठरला. संजूने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत आयकॉनिक खेळी केली. संजूने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. संजूने टीम इंडियाला टी 20I वर्ल्ड कप जिंकून देण्यात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. संजूला त्यासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं. संजूने हाच तडाखा आयपीएलच्या 19 व्या मोसमातही (IPL 2026) कायम ठेवला. संजूने या हंगामात आतापर्यंत 2 शतकं झळकावली. मात्र त्यानंतरही संजूला मोठा झटका लागला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 35 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचा अनुभवी फलंदाज केएल राहुल याने पंजाब किंग्स विरुद्ध दीडशतकी खेळी केली. केएलने नाबाद 152 धावा केल्या. केएलने या खेळीत 16 चौकार आणि 9 षटकार लगावले. केएल यासह आयपीएल स्पर्धेत एका खेळीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. तसेच केएल या दरम्यान दिल्ली कॅपिट्ल्सकडून वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. केएलने 47 चेंडूत शतक झळकावलं. केएलने यासह संजूला पछाडलं.

गेलची बरोबरी, संजूला पछाडलं

केएलचं हे त्याच्या कारकीर्दीतील एकूण सहावं शतक ठरलं. केएल यासह आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक शतकं करणारा संयुक्तरित्या तिसरा तर एकूण दुसरा भारतीय ठरला आहे. केएलने 6 शतकांसह माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच केएलने संजू सॅमसन याला शतकांबाबत मागे टाकलं. संजूने त्याच्या कारकीर्दीत एकूण 5 शतकं झळकावली आहेत.

संजूने 19 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्स आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध शतक झळकावलं होतं. संजूने यासह आयपीएल कारकीर्दीतील पाचवं शतक पूर्ण केलं. मात्र केएलने पंजाब विरुद्ध शतक झळकावून संजूला मागे टाकलं.

आयपीएल आणि सर्वाधिक शतकं

दरम्यान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 8 शतकांचा विक्रम हा आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहे. तर जोस बटलर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. बटलरने 7 शतकं लगावली आहेत.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल