AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेला जेमिमा, हेमलतानं झुकवलं, 41 धावांनी भारताचा विजय

भारताकडून हेमलता आणि दीप्तीनं केलेली खेळी चांगलीच चर्चेत आहे.

श्रीलंकेला जेमिमा, हेमलतानं झुकवलं, 41 धावांनी भारताचा विजय
श्रीलंकेविरुद्ध 41 धावांनी भारताचा विजयImage Credit source: social
| Updated on: Oct 01, 2022 | 7:26 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची (women’s cricket team) दमदार खेळाडू आणि जिची ओळख ऑलराऊंडर आहे त्या दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) पुन्हा एकदा अघ्या क्रीडाविश्वाचं लक्ष वेधलंय. ती तिच्या रनआऊटमुळे खूप चर्चेत आहे. इंग्लंडमधील (England) लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आठवडाभरापूर्वी नॉन स्ट्रायकरला धावबाद करून चर्चेत आलेल्या दीप्तीबाबत त्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. या सगळ्यात दीप्ती शर्मा पुन्हा एकदा रनआऊट झाली आणि तिनं पुन्हा वातावरण तापवलं. लंडननंतर दीप्तीनं बांगलादेशातील सिल्हेत येथे आणखी एक उत्कृष्ट रनआउट केलंय. ज्याची चर्चा होतेय.

सामन्यात काय झालं?

भारतीय महिला क्रिकेट संघानं आज (शनिवार) सिलहट आऊटर क्रिकेट स्टेडियमवर आशिया कप 2022 T20 स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा 41 धावांनी पराभव केला . श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात भारताने 20 षटकांत 6 बाद 150 धावा केल्या आणि त्यानंतर 18.2 षटकांत श्रीलंकेचा डाव 109 धावांत गुंडाळला. भारताकडून हेमलताने तीन आणि पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हा व्हिडीओ पाहा

टीम इंडियाची स्टार ऑलराऊंडर दीप्ती शर्मा तिच्या रनआऊटमुळे खूप चर्चेत आहे.  इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आठवडाभरापूर्वी नॉन स्ट्रायकरला धावबाद करून चर्चेत आलेल्या दीप्तीबाबत त्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे.

या सगळ्यात दीप्ती शर्मा पुन्हा एकदा रनआऊट झाली आणि तिने पुन्हा वातावरण तापवले. लंडननंतर दीप्तीने बांगलादेशातील सिल्हेत येथे आणखी एक उत्कृष्ट रनआउट केले, ज्याची चर्चा होत आहे.

24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेमध्ये दीप्ती शर्माने इंग्लंडच्या चार्ली डीनला नॉन-स्ट्राइकवर धावबाद करून दहशत निर्माण केली.

आता 6 दिवसांनंतर बांगलादेशातील महिला आशिया कपमध्ये दीप्ती शर्माचं पुन्हा धावबाद केलेलंही चर्चेत आलंय. यावेळी फरक एवढाच होता की दीप्तीच्या धावबादवर प्रश्नचिन्ह लावण्याचे धाडस कोणातही नव्हते.

दीप्तीचा अतिशय अचूक थ्रो

महिला आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात आज सिलहेत येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. टीम इंडियाकडून श्रीलंकेला 151 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, चौथ्या षटकातच श्रीलंकेने कर्णधार चमारी अटापट्टूची विकेट गमावली.

त्यानंतर सहाव्या षटकात मलशा शेहानीने शॉर्ट कव्हर्सच्या दिशेने एक चेंडू हलका खेळला आणि धावांसाठी धाव घेतली.

शेहानीनं झटपट धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण दीप्ती शर्माच्या चपळाईसमोर ती अपयशी ठरली. दीप्तीने पॉईंटवरून येऊन झटपट चेंडू उचलला आणि नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला वेगवान आणि अचूक थ्रो मारला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.