दिल्लीतील स्फोटामुळे हा मोठा सामना रद्द होणार? खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

राजधानी दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी म्हणजेच सोमवारी संध्याकाळच्या सुमारास स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या स्फोटाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. असं असताना दिल्लीत होणारा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील स्फोटामुळे हा मोठा सामना रद्द होणार? खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
दिल्लीतील स्फोटामुळे हा मोठा सामना रद्द होणार? खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
Image Credit source: ANI/Getty
Updated on: Nov 10, 2025 | 9:54 PM

राजधानी दिल्ली स्फोटांनी हादरली असून संपूर्ण देशात हायअलर्ट देण्यात आला आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट नाही. प्रथमदर्शनी घातपाती हल्ला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटामुळे लाल किल्ला परिसरात तीन गाड्या जळून खाक झाल्या. त्यामुळे देशभरातली अनेक राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. खासकरून गर्दीची ठिकाणी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, देशात रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेच्या चौथ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. स्फोटाच्या ठिकाणापासून जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या अरूण जेटली मैदानात दिल्ली विरुद्ध जम्मू काश्मीर सामना सुरु आहे. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने मैदानात हजेरी लावत असतो.  दिल्लीत हायअलर्ट जारी केल्याने हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. कारण खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिल्ली आणि जम्मू काश्मीर सामना

दिल्ली आणि जम्मू काश्मीर हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून जम्मू काश्मीरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 211 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना जम्मू काश्मीर संघाने 310 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दिल्लीने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 277 धावा केल्या. जम्मू काश्मीरने आघाडी घेतलेल्या 99 धावा वजा करता 178 धावांचं आव्हान जम्मू काश्मीर समोर ठेवलं आहे. जम्मू काश्मीरने दुसऱ्या डावात 2 गडी गमवून 55 धावा केल्या आहेत. अजूनही जम्मू काश्मीरला विजयासाठी 124 धावांची गरज आहे. जम्मू काश्मीरकडून कामरान इकबाल नाबाद 32, तर वंशज शर्माने 12 चेंडूचा सामना केला आणि एकही धावा काढली नाही.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेचा संघही भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना गुवाहाटीतील बारसापरा मैदानात 22 नोव्हेंबरपासून  होणार आहे.  तर 30 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. सध्याची स्थिती पाहता या मालिकेसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत होण्याची शक्यता आहे.