Video : आधीच्या षटकात हॅरी ब्रूकने आकाश दीपला मारले 4,4,6… तरी गिलने दिलं पुढचं षटक आणि…
भारत आणि इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्रजांची स्थिती नाजूक आहे. 100 धावांच्या आत आघाडीचे चार फलंदाज गमावले आहेत. भारताला चौथी विकेट हॅरी ब्रूकच्या रुपाने मिळाली. पण त्याआधी काय झालं ते जाणून घ्या.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडची पडझड झाली. पहिल्या सत्रात इंग्लंडने चार गडी गमावले. मोहम्मद सिराज, नितीश कुमार रेड्डी यांनी विकेट काढल्यानंतर आकाश दीपलाही यश मिळालं. आकाश दीप विकेट काढेल असा विश्वास शुबमन गिलला होता. म्हणून त्याच्याकडे षटक सोपवलं होतं. पण हॅरी ब्रूक बेजबॉल अंदाज दाखवत त्याला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डावातील 20वं षटक टाकण्यासाठी आकाश दीपला बोलवलं होतं. या षटकात एकूण 15 धावा आल्या. जो रूटने दोन चेंडू निर्धाव घालवल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि हॅरी ब्रूकला स्ट्राईक दिली. त्याने पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारले. तसेच शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि त्याला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. आता त्याला पुढचं षटक काही मिळणार नाही असंच वाटत होतं. पण शुबमन गिलने त्याच्यावर पुन्हा विश्वास टाकला आणि षटक दिलं.
पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जो रूटने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि हॅरी ब्रूकला स्ट्राईक दिली. त्यामुळे आकाश दीप आणि हॅरी ब्रूक पुन्हा आमनेसामने आले. पण यावेळी आकाश दीप वरचढ ठरला. त्याने टाकलेला चेंडू मारताना हॅरी ब्रूक फसला आणि मधला स्टंप घेऊन गेला. हॅरी ब्रूकचा खेळ 19 चेंडूत 23 धावा करून आटोपला. हॅरी ब्रूक बाद होण्यापूर्वी इंग्लंडची धावसंख्या 87 वर 3 विकेट अशी होती.
WHAT A COMEBACK BY AKASHDEEP…!!
– 4,4,6 in the last over. – Comeback again and get Brook in the 2nd ball. pic.twitter.com/8bdzktB8hn
— Johns. (@CricCrazyJohns) July 13, 2025
हॅरी ब्रूकने धाडसी पूर्वनियोजित स्वीपसाठी जाण्याचा प्रयत्न केला. पण आकाश दीपच्या चेंडूवर त्याच्या पायाच्या मागून चेंडू घुसला आणि बाद झाला. चेंडूची उसळीत हॅरी ब्रूक फसला. बाद झाल्यानंतर काही काळ टप्पा आणि उसळी पाहात बसला. हॅरी ब्रूक बाद झालेला चेंडू 25 षटकं जुना आहे. त्यामुळे इंग्लंडला किती साथ मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, इंग्लंडने लंच ब्रेकपर्यंत 25 षटकात 4 गडी गमवून 98 धावा केल्या. जो रूट नाबाद 17 आणि बेन स्टोक्स नाबाद 2 धावांवर खेळत आहे.
