AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : शतकी खेळी करूनही हा खेळाडू ठरला भारताचा पराभवाचं कारण, झालं असं की…

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने सरशी मारली. पहिल्या सामन्यात खरं तर भारताची बाजू भक्कम होती. पण एका खेळाडूच्या चार चुका टीम इंडियाच्या पराभवाचं कारण ठरल्या. शतकी खेळी करूनही सर्व काही व्यर्थ गेलं.

IND vs ENG : शतकी खेळी करूनही हा खेळाडू ठरला भारताचा पराभवाचं कारण, झालं असं की...
IND vs ENG : भारताच्या पराभवासाठी हा स्टार खेळाडू ठरला कारणीभूत, एक नाही तर चारवेळा केली तीच चूकImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 24, 2025 | 11:09 PM
Share

भारताने इंग्लंड विरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात पराभवाने झाली. तसेच शुबमन गिलच्या कसोटी नेतृत्वावर पहिल्याच पराभवाने डाग लागला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने 471 धावांची मजबूत खेळी केली होती. तसेच पहिल्या डावात इंग्लंडला 465 धावांवर रोखलं होतं. खरं तर पहिल्या डावात 6 ऐवजी मोठी आघाडी असू शकली असती. पण या डावात भारताकडून स्टार तीन झेल सुटले होते. तसेच दुसऱ्या डावातही त्याने एक झेल सोडला. त्याच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे इंग्लंडला बळ मिळालं. तसेच विकेटसाठी धडपड करणाऱ्या गोलंदाजांचा संताप झाला. दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजी यशस्वी जयस्वालने झेल सोडला तेव्हा त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. हा झेल सोडल्याने दुसऱ्या डावात इंग्लंडला मोठी भागीदारी करता आली.

बेन डकेट आणि जॅक क्राउली ही जोडी मैदानात तग धरून होती. या दोघांमध्ये 150 हून अधिक धावांची भागीदारी झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या सेशनमध्ये भारतीय गोलंदाजाना काही विकेट मिळाली नव्हती. पण या डावाच्या 39व्या षटकात मोहम्मद सिराजला एक संधी मिळाली. पण सीमेवर यशस्वी जयस्वालने सोपा झेल सोडला. सिराजच्या चेंडूवर डकेटने डीप बॅकवर्ड स्क्वेअरला शॉट मारला. यशस्वी झेलच्या खाली आला होता. डाइव्ह मारून झेल पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हातातून झेल सुटला. यामुळे सिराज खूपच निराश दिसला. बेन डकेटचा झेल सोडला तेव्हा तो 97 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने आपलं शतक पूर्ण केलं. तसेच विजयी धावांत आणखी भर घातली.

यशस्वी जयस्वालने पहिल्या डावात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर तीन झेल सोडले होते. एका सामन्यात यशस्वीने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कारण इतके झेल आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजांनी सोडले नव्हते. यशस्वी जयस्वालच्या या कामगिरीमुळे ड्रेसिंग रुममध्ये बसलेला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही संतापला होता. दरम्यान, पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने 101 धावा केल्या होत्या. मात्र दुसर्‍या डावात फक्त 4 धावा करून तंबूत परतला.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.